साताऱ्यात पावसाचा शिडकावा; जिल्ह्यात ढगाळ वातावरण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:40 AM2021-05-19T04:40:24+5:302021-05-19T04:40:24+5:30
सातारा : जिल्ह्यात दोन दिवस तौक्ते चक्रीवादळामुळे पाऊस झाला. पण, मंगळवारी बहुतांशी भागात ढगाळ वातावरण होते तर सातारा शहरात ...
सातारा : जिल्ह्यात दोन दिवस तौक्ते चक्रीवादळामुळे पाऊस झाला. पण, मंगळवारी बहुतांशी भागात ढगाळ वातावरण होते तर सातारा शहरात पावसाचा शिडकावा झाला.
जिल्ह्यात मागील सहा दिवसांपासून वळवाचा पाऊस पडत आहे. तीन दिवस वळवाचा पाऊस पडल्यानंतर तौक्ते चक्रीवादळचा प्रभाव जाणवला. त्यामुळे दोन दिवस वारे वाहत होते तसेच पाऊसही पडला. जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. पण, पावसाचा जोर अधिक करून सातारा, पाटण, महाबळेश्वर, वाई, जावळी या पश्चिम भागातील तालुक्यात जाणवला तसेच वारे वाहत होते. त्यामुळे झाडे, विजेचे खांब पडले. काही ठिकाणी घरांवरील पत्रेही उडाले. त्यामुळे मोठे नुकसान झाले.
तौक्ते चक्रीवादळाचा प्रभाव ओसरल्यानंतर जिल्ह्यात मंगळवारी काही ठिकाणी ऊन पडले होते तर अनेक भागांत ढगाळ वातावरण होते. सातारा शहर आणि परिसरात दिवसभर ऊन नव्हते. ढगाळ वातावरण कायम होते. दुपारच्या सुमारास पावसाचा शिडकावा झाला तर सायंकाळच्या सुमारास थंडगार वारे वाहण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे चांगलाच गारठा जाणवत होता.
.........................................................................