साताºयातील शेकडो घरे अन् दुकानांमध्ये पावसाचे पाणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 06:43 PM2017-09-15T18:43:06+5:302017-09-15T18:49:58+5:30
सातारा : साताºयात शुक्रवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने गोडोली, सदरबझार परिसरांत हाहाकार माजविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : साताºयात शुक्रवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने गोडोली, सदरबझार परिसरांत हाहाकार माजविला. ओढ्याचे पाणी शेकडो घरे, पन्नासहून अधिक दुकानांमध्ये शिरल्याने संस्कारोपयोगी वस्तू, दुकानातील साहित्य पावसाच्या पाण्यात वाहून गेले. अनेक गाड्यांच्या इंजिनमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.
साताºयातील नैसर्गिक ओढ्यांवर अनेकांनी अतिक्रमण केले आहे. ओढ्यांचा प्रवाह अडवून वसाहती बांधल्या आहेत. त्याचा परिणाम सातारकरांना दरवर्षी सहन करावा लागतो. साताºयात शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला.
गोडोली, सदरबझार येथील ओढे तुंबल्याने ओढ्यांचे पाणी लोकवस्तीत शिरले. गोडोली तळ्याशेजारील शंभरहून अधिक घरे तसेच पन्नासहून अधिक दुकानांमध्ये कमरे एवढे पाणी साठले होते. अचानक पाणी वाढू लागल्याने नागरिकांना काय करावे, हेच कळेना. मिळेल त्या साधनांचा वापर करून पाणी काढण्याचा काही काळ प्रयत्न झाला. परंतु, पाणी वाढत होते. तळघरात असलेल्या दुकानांचे यामध्ये मोठे नुकसान झाले. अनेक नागरिकांनी संसारोपयोगी वस्तू घरातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेणे पसंत केले.
सोमंथळी पूल वाहून गेला
फलटण तालुक्यात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे फलटण-बारामती रस्त्यावरील सोमंथळी येथील पूल रात्री उशिरा वाहून गेला. त्यामुळे तो वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.