साताऱ्यात पावसाची उघडीप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:49 AM2021-09-16T04:49:27+5:302021-09-16T04:49:27+5:30
सातारा : सातारा शहरासह परिसरात बुधवारी दुसऱ्यादिवशीही पावसाची उघडीप कायम होती. मात्र, दिवसभर ढगाळ वातावरण कायम होते. सातारा शहरात ...
सातारा : सातारा शहरासह परिसरात बुधवारी दुसऱ्यादिवशीही पावसाची उघडीप कायम होती. मात्र, दिवसभर ढगाळ वातावरण कायम होते.
सातारा शहरात मागील १० दिवसांपासून पाऊस सुरू होता. सुरुवातीला काही दिवस चांगला पाऊस झाला. त्यानंतर पावसाच्या सरी पडत होत्या. मात्र, दोन दिवसांपासून पावसाची उघडीप आहे. मंगळवारी तर दुपारनंतर ऊन पडले होते. बुधवारीही पाऊस पडला नाही. मात्र, दिवसभर ढगाळ वातावरण तयार झालेले. सातारा शहर व परिसरात वातावरणात गारवा आहे.
.......................................
पुलाचे काम पूर्ण करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : माण तालुक्यातील म्हसवड-वरकुटे मलवडी मार्गावरील शिरताव येथील पुलाचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
शिरताव येथे मागील काही महिन्यांपासून पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक वळविण्यात आली आहे. सध्या पावसाळा सुरू आहे. परतीचा पाऊस तालुक्यात अधिक होतो. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पुलाचे काम पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
...........................................................