सातारा जिल्'ातील पेरणीवर पावसाचा परिणाम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 06:40 PM2019-12-19T18:40:16+5:302019-12-19T18:42:28+5:30

दरवर्षी आॅक्टोबर महिन्यापासून रब्बी हंगामाची पेरणी सुरू होते. पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात खरिपातील पिके काढल्यानंतर रब्बीला सुरुवात होते. सुरुवातीच्या काळात ज्वारीची पेरणी करण्यात येते. त्यानंतर गहू, हरभरा, मका पिकाची पेरणी सुरू होते.

Rainfall on sowing in Satara district! | सातारा जिल्'ातील पेरणीवर पावसाचा परिणाम !

सातारा जिल्'ातील पेरणीवर पावसाचा परिणाम !

Next

सातारा : यावर्षी सततचा आणि नोव्हेंबर महिन्यामध्येही झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्'ातील रब्बी पेरणी पुढे गेली. त्यामुळे आतापर्यंत फक्त ७० टक्केच पेरणी झालीय. तर गतवर्षी ८० टक्केहून अधिक पेरणी झालेली. यावर्षी ज्वारीच्या क्षेत्रात घट होत असून, आतापर्यंत फक्त ७५ टक्केच पेरणी झाली आहे. तर यापुढे गहू, हरभऱ्यालाच शेतकरी पसंती देऊ शकतात.

दरवर्षी आॅक्टोबर महिन्यापासून रब्बी हंगामाची पेरणी सुरू होते. पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात खरिपातील पिके काढल्यानंतर रब्बीला सुरुवात होते. सुरुवातीच्या काळात ज्वारीची पेरणी करण्यात येते. त्यानंतर गहू, हरभरा, मका पिकाची पेरणी सुरू होते. यंदा मात्र पावसामुळे रब्बी हंगामातील पेरणीचे संपूर्ण चित्रच पालटलंय. कारण, यावर्षी जुलै महिन्यापासून पश्चिम भागात सतत पाऊस सुरू झाला. तो नोव्हेंबर महिन्यापर्यंत होत होता. तसेच पूर्व भागात तर सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात पावसाला जोरदार सुरुवात झाली.

हा परतीचा पाऊस आॅक्टोबर महिन्यापर्यंत सतत कोसळत होता. या पावसाने गेल्या दहा वर्षांतील उच्चांक गाठला. त्यातच दिवाळीनंतरही नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाने चांगलाच दणका दिला. त्यामुळे जमिनीत पाणी साठले. परिणामी आगाऊ पेरणी केलेलीही वाया गेली. त्यामुळे काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले.

जिल्'ातील शेतकऱ्यांनी ख-या अर्थाने रब्बी हंगामाची पेरणी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात सुरू केली. त्यामुळे पेरणीला उशीर होऊ लागलाय. काही ठिकाणी ज्वारीची दुबार पेरणी झालीय. सध्या जिल्'ात रब्बी हंगामाची पेरणी जवळपास ७० टक्के झालीय. रब्बीचे क्षेत्र २ लाख १४ हजार ८२३ हेक्टर असलेतरी आतापर्यंत १ लाख ५० हजार हेक्टरवरच पेरणी झाली आहे. त्यामध्ये ज्वारीची पेरणी ७५ टक्के, गहू ५५, मका ६८, हरभरा ६२ टक्के अशी प्रमुख पिकांची पेरणीची टक्केवारी राहिलीय.

जिल्'ात सर्वात जास्त रब्बीचे क्षेत्र माण तालुक्यात २८ हजार ८५५ हेक्टर असून, आतापर्यंत येथे २५ हजार ९०० हेक्टरवर पेरणी झालीय. यापुढे ज्वारीची पेरणी होण्याची शक्यता कमी आहे. खटावला २२ हजार हेक्टर क्षेत्र असलेतरी पेरणी फक्त ८ हजार ६०० हेक्टरवरच झालीय. फलटणला २१ हजारपैकी १६ हजार हेक्टर ज्वारीची पेरणी झाल्याचे दिसून आले आहे.

जिल्'ाचा विचार करता सातारा तालुक्यात आतापर्यंत ५५ टक्के पेरणी झालीय. तसेच जावळीत ६४ टक्के, पाटण ७६, क-हाड ५७, कोरेगाव ७७, खटाव ४७, माण तालुका ९०, फलटण ६९, खंडाळा ७४, वाई ८३ टक्के पेरणी झाली आहे. तर महाबळेश्वर तालुक्यात रब्बीचे क्षेत्र ६४८ हेक्टर असून, पेरणी १०० टक्के झाली आहे. रब्बीची पेरणी अजूनही सुरू असून, यापुढे गहू, हरभरा, मका पिकालाच शेतकरी पसंती देतील, असेच चित्र आहे. तसेच इतर पिकांचाही त्यांच्यापुढे पर्याय आहे.

सर्वच पिकांची यंदा पेरणी टक्केवारी कमी...
गतवर्षी १९ डिसेंबरपर्यंत जिल्'ात रब्बीची पेरणी जवळपास ८० टक्के झालेली. यामध्ये ज्वारीची ८२ टक्के, गहू ६२, हरभरा ७७ टक्के क्षेत्रावर होता. रब्बीतील या तिन्ही प्रमुख पिकांची चांगली पेरणी झालेली. यावर्षी मात्र या तिन्ही पीक पेरणीत घट झाली आहे. तसेच गतवर्षीपेक्षा यंदा सर्वच पीक पेरणी कमी झाल्याचेच दिसून येत आहे.

 

Web Title: Rainfall on sowing in Satara district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.