माण तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी पाऊस
By admin | Published: June 8, 2017 07:18 PM2017-06-08T19:18:56+5:302017-06-08T19:18:56+5:30
तालुक्यावर वरूणराज्याची कृपादृष्टी
आॅनलाईन लोकमत
दहिवडी : नेहमी पाचवीला दुष्काळ पुजलेल्या माण तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावल्याने बंधारे हाऊसफुल्ल झाले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. तर पश्चिम भागामध्ये पावसाचा एकही थेंब पडला नाही. ऐन उन्हाळ्यामध्ये माण तालुक्यात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. त्यामुळेच दृष्काळी माण तालुक्यावर वरूणराज्याने कृपादृष्टी दाखविल्याचे यानिमित्ताने बोलले जात आहे.
गुरूवारी दुपारी वातावरण ढगाळमय झाले होते. दुपारी चार वाजता विजेच्या कडकडासह पावसाने हजेरी लावली. केवळ दीड तासांत दहिवडी परिसरातील नव्याने बांधण्यात आलेले बंधारे भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलास मिळाला आहे.