काळगाव विभागात पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:35 AM2021-07-26T04:35:11+5:302021-07-26T04:35:11+5:30

काळगाव (ता. पाटण) विभागात सलग पडणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने संपर्क साधणे अवघड ...

Rains hit Kalgaon division | काळगाव विभागात पावसाचा तडाखा

काळगाव विभागात पावसाचा तडाखा

googlenewsNext

काळगाव (ता. पाटण) विभागात सलग पडणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने संपर्क साधणे अवघड झाले आहे. मोबाईल स्वीच ऑफ झाल्याने बाहेरून फोन करणाऱ्या लोकांची घालमेल सुरू आहे. आता पाऊस ओसरू लागल्याने ग्रामस्थांना झालेल्या नुकसानीचा अंदाज येऊ लागला आहे. प्रचंड पावसाने ग्रामस्थांना घराबाहेर पडणेही अवघड बनले होते. काळगावपासून २ ते ३ किलोमीटर अंतरावर डोंगरात वसलेल्या जोशीवाडीला पावसाचा तडाखा बसला आहे. १० ते १२ घरे असलेल्या या वस्तीत ५० ते ६० ग्रामस्थ राहतात. शनिवारी मध्यरात्री येथील घरांच्या पाठीमागे सुमारे दोन फूट, तर घरांच्या पुढे साधारण वीस फुटाच्या अंतरावर मोठी चर पडली आहे. त्यामुळे सुरक्षेसाठी येथील ग्रामस्थांना करपेवाडी शाळेत ठेवले होते, तसेच काळगावमधील मराठी शाळेजवळ असलेल्या एका घराला चिरा पडल्यामुळे त्यांना सुरक्षेसाठी दुसऱ्या घरात हलवले आहे. याशिवाय काळगावमधील पूल, भरेवाडी येथील पूल वाहतूक करण्यायोग्य राहिला नाही. रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे.

फोटो : २५केआरडी०१

कॅप्शन : काळगाव (ता. पाटण) येथील रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.

Web Title: Rains hit Kalgaon division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.