सातारा जिल्ह्यात पावसाचा हाहाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:23 AM2021-07-24T04:23:14+5:302021-07-24T04:23:14+5:30
सातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून गुरुवारी दिवसभर आणि शुक्रवारी सकाळपर्यंत मिळून सरासरी ६०.०७ मिलिमीटर पाऊस झाला, तर ...
सातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून गुरुवारी दिवसभर आणि शुक्रवारी सकाळपर्यंत मिळून सरासरी ६०.०७ मिलिमीटर पाऊस झाला, तर यावर्षी आतापर्यंत सरासरी २६६ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, कऱ्हाड, पाटण तालुक्यातील अनेक गावांमध्ये पुरामुळे हाहाकार निर्माण झाला आहे. पाटण तालुक्यात पाच गावांमध्ये दरड कोसळली असून वीसहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी १० पर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मिलिमीटरमध्ये अशी आहे. सातारा तालुका - ३३.०७ (२२६.०३), जावळी - १०६.०९ (४०१.०९), पाटण - २११.०९ (५१०.०४), कऱ्हाड तालुका - ४७.०३ (२०३.०१), कोरेगाव - ८.०६ (१४३.०२), खटाव - ४.०६ (८६.०३), माण तालुका - ०.०१ (१२६.०५) , फलटण - ० (७०.०१), खंडाळा - १५.०२ (८३.०९), वाई - ६५.०३ (२९८.०१), आणि महाबळेश्वर तालुका - १८५.०२ (११६९.०३) मिलीमीटर. दरम्यान, शुक्रवारी दिवसभर पावसाचा जोर कायम होता.