कऱ्हाडसह मलकापूर परिसरात पावसाने दाणादान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 02:15 PM2021-06-02T14:15:28+5:302021-06-02T14:23:49+5:30

Rain Satara : मलकापूरसह परिसरात सोमवार आणि मंगळवारी पडलेल्या जोराच्या पावसामुळे गटारे ओव्हरफ्लो होऊन सर्वांची दाणादान उडाली. उपमार्ग व कराड-ढेबेवाडी रस्त्यालगतच्या अनेक दुकानात पाणी शिरले होते. शहरातील सखल भागातील घरांमधून पाणी शिरल्याने काही घरातील संसारोपयोगी साहित्य भिजून नुकसान झाले . अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणीच पाणी झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती.

Rains in Malkapur area including Karhad | कऱ्हाडसह मलकापूर परिसरात पावसाने दाणादान

कऱ्हाडसह मलकापूर परिसरात पावसाने दाणादान

Next
ठळक मुद्दे २० दुकानासह अनेक घरात पाणी व्यावसायिकांसह संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान

मलकापूर  :  मलकापूरसह परिसरात सोमवार आणि मंगळवारी पडलेल्या जोराच्या पावसामुळे गटारे ओव्हरफ्लो होऊन सर्वांची दाणादान उडाली. उपमार्ग व कराड-ढेबेवाडी रस्त्यालगतच्या अनेक दुकानात पाणी शिरले होते. शहरातील सखल भागातील घरांमधून पाणी शिरल्याने काही घरातील संसारोपयोगी साहित्य भिजून नुकसान झाले . अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणीच पाणी झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती.

दोन दिवसात ढगफुटीसदृष्य पावसाने जोरदार हजेरी लावली. या पडलेल्या जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणीचपाणी झाले होते. नाले ओव्हरफ्लो झाल्यामुळे मलकापूरातील प्रमुख मार्गांसह अंतर्गत रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात पाणी आले.

कराड-ढेबेवाडी रस्त्यालगत मोरया काँम्प्लेक्स मधील १० दुकानात, शिवछावा चौकातील गुरुकृपा आपार्टमेंट मधील देवकर हार्डवेअर दुकानासह पाच दुकानात, तर विनायक कॉलनीलगतच्या सहा दुकानात पाणी शिरल्याने मालासह फर्निचरचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या अनेक दुकानात अचानक पाणी शिरल्यामुळे सर्वांचीच धावपळ उडाली. बेसमेंटच्या दुकानातील पाणी काढण्यासाठी दुकानदारांनी रात्री उशीरापर्यत विद्यूतपंप लावले होते.

मलकापूरसह परिसरात ऊस शेती जास्त आहे. दोन दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांनी काबाड कष्ठ करत जोमात आलेले ऊसाचे पीक अनेक ठिकाणी भुईसफाट झाले आहे. ऊसपीक आडवे झाल्यामुळे भविष्यात ऊसाचे वजन कमी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.

आगाशिव डोंगरावरून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी आल्याने जखिणवाडीसह नांदलापूरचे ओढे नाले दुथडी भरून वाहत होते. याशिवाय मलकापूर फाटा ते पाचवडफाटा परिसरात पवारवस्ती व थोरातमळ्यालगत पुर्वेकडील उपमार्गावर पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.

आयोध्यानगरीसह लाहोटीनगरमधील घरात पाणी

आयोध्यानगरीसह लाहोटीनगर परिसर मुळातच सखालभागात आहे. पाऊस म्हटलं की या भागात पाणीच पाणी होते. त्यात मंगळवारी अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे कराड-ढेबेवाडी रस्त्याचे आयोध्यानगरीत तर महामार्गावरील पाणी लाहोटीनगरमध्ये घुसले. या भागातील नाले ओव्हरफ्लो होऊन अनेक घरात पाणी घुसल्यामुळे साहित्याचे नुकसान झाले आहे.

बागल वस्तीत घरात गुडघाभर पाणी

बागलवस्ती मध्ये आनिल शिंदे यांचे घर आहे. या घराच्या चारी बाजूनी मोठ्या इमारती झाल्या आहेत. याघराचे सांडपाणी व पावसाचे पाणि जाण्यासाठी मार्गच उरला नाही. मंगळवारी झालेल्या पावसाने शिंदे यांच्या घरात तीन फूट पाणी साचले होते त्यामुळे संसारोपयोगी साहित्य भिजून नुकसान झाले आहे.


मलकापूरात पडलेले महाकाय झाड हटवण्यासाठी ट्रँक्टरसह आधुनिक कटरचा वापर करावा लागला. चार तासानंतर हा रस्ता वाहतूकीस खुला केला. ( छाया माणिक डोंगरे)

Web Title: Rains in Malkapur area including Karhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.