कऱ्हाडसह मलकापूर परिसरात पावसाने दाणादान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:27 AM2021-06-03T04:27:50+5:302021-06-03T04:27:50+5:30

मलकापूर : मलकापूरसह परिसरात सोमवार आणि मंगळवारी पडलेल्या जोराच्या पावसामुळे गटारे ओव्हरफ्लो होऊन सर्वांची दाणादाण उडाली. उपमार्ग व कराड-ढेबेवाडी ...

Rains in Malkapur area including Karhad | कऱ्हाडसह मलकापूर परिसरात पावसाने दाणादान

कऱ्हाडसह मलकापूर परिसरात पावसाने दाणादान

googlenewsNext

मलकापूर :

मलकापूरसह परिसरात सोमवार आणि मंगळवारी पडलेल्या जोराच्या पावसामुळे गटारे ओव्हरफ्लो होऊन सर्वांची दाणादाण उडाली. उपमार्ग व कराड-ढेबेवाडी रस्त्यालगतच्या अनेक दुकानात पाणी शिरले होते. शहरातील सखल भागातील घरांमधून पाणी शिरल्याने काही घरांतील संसारोपयोगी साहित्य भिजून नुकसान झाले. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणीच पाणी झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती.

दोन दिवसांत ढगफुटीसदृश पावसाने जोरदार हजेरी लावली. या पडलेल्या जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. नाले ओव्हरफ्लो झाल्यामुळे मलकापुरातील प्रमुख मार्गांसह अंतर्गत रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात पाणी आले. कराड-ढेबेवाडी रस्त्यालगत मोरया काॅम्प्लेक्समधील १० दुकानांत, शिवछावा चौकातील गुरुकृपा आपार्टमेंटमधील देवकर हार्डवेअर दुकानासह पाच दुकानांत, तर विनायक कॉलनीलगतच्या सहा दुकानांत पाणी शिरल्याने मालासह फर्निचरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या अनेक दुकानांत अचानक पाणी शिरल्यामुळे सर्वांचीच धावपळ उडाली. बेसमेंटच्या दुकानांतील पाणी काढण्यासाठी दुकानदारांनी रात्री उशिरापर्यंत विद्युत पंप लावले होते.

मलकापूरसह परिसरात ऊस शेती जास्त आहे. दोन दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने जोमात आणलेल्या उसाचे पीक अनेक ठिकाणी भुईसपाट झाले आहे. ऊस आडवा झाल्यामुळे भविष्यात उसाचे वजन कमी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. आगाशिव डोंगरावरून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी आल्याने जखीणवाडीसह नांदलापूरचे ओढे, नाले दुथडी भरून वाहत होते. याशिवाय मलकापूर फाटा ते पाचवड फाटा परिसरात पवार वस्ती व थोरात मळ्यालगत पूर्वेकडील उपमार्गावर पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.

चौकट (फोटो आहे)

अयोध्यानगरीसह लाहोटीनगरमधील घरात पाणी

अयोध्यानगरीसह लाहोटीनगर परिसर मुळातच सखल भागात आहे. पाऊस म्हटलं की, या भागात पाणीच पाणी होते. त्यात मंगळवारी अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे कराड-ढेबेवाडी रस्त्याचे अयोध्यानगरीत तर महामार्गावरील पाणी लाहोटीनगरमध्ये घुसले. या भागातील नाले ओव्हरफ्लो होऊन अनेक घरांत पाणी घुसल्यामुळे साहित्याचे नुकसान झाले आहे.

चौकट ( फोटो आहे)

बागल वस्तीत घरात गुडघाभर पाणी

बागलवस्तीमध्ये अनिल शिंदे यांचे घर आहे. या घराच्या चारी बाजूने मोठ्या इमारती झाल्या आहेत. या घराचे सांडपाणी व पावसाचे पाणी जाण्यासाठी मार्गच उरला नाही. मंगळवारी झालेल्या पावसाने शिंदे यांच्या घरात तीन फूट पाणी साचले होते. त्यामुळे संसारोपयोगी साहित्य भिजून नुकसान झाले आहे.

फोटो ओळ

मलकापुरात पडलेले महाकाय झाड हटवण्यासाठी ट्रॅक्टरसह आधुनिक कटरचा वापर करावा लागला. चार तासांनंतर हा रस्ता वाहतुकीस खुला केला. ( छाया : माणिक डोंगरे)

===Photopath===

020621\img_20210602_131035.jpg

===Caption===

फोटो कॕप्शन

मलकापूरात पडलेले महाकाय झाड हटवण्यासाठी ट्रॕक्टरच्या उजाडासह आधुनिक कटरचा वापर करावा लागला. चार तासानंतला रस्ता वाहतूकीस खुला केला. ( छाया माणिक डोंगरे)

Web Title: Rains in Malkapur area including Karhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.