साताऱ्यात पावसाची रिमझिम, ऊन-पावसाचा खेळ सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 12:26 PM2019-06-28T12:26:20+5:302019-06-28T12:27:11+5:30
सातारा शहर परिसरात पावसाचा जोर मंदावलेलाच आहे. सकाळपासून ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. ढगाळ वातावरण असले तरी अधूनमधून रिमझिम सरी कोसळत आहेत.
सातारा : सातारा शहर परिसरात पावसाचा जोर मंदावलेलाच आहे. सकाळपासून ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. ढगाळ वातावरण असले तरी अधूनमधून रिमझिम सरी कोसळत आहेत.
सातारा जिल्ह्यात दरवर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस ुसुरू असतो. यंदा मात्र पावसाने पूर्णपणे पाठ फिरविली आहे. यंदाच्या हंगामात आजवर मोठा पाऊस फारसा पडलेला नाही. रिमझिम पाऊस पडत असल्याने तो जमिनीत मुरत आहे. यवतेश्वर घाटात डोंगराला पाझर लागलेला आहे. पण तरीही अद्याप कास, महादरे तलावात फारसे पाणी वाढलेले नाही. त्यामुळे सातारकरांना पाणी कपातीचा सामना करावाच लागत आहे.
जिल्ह्यात सकाळी आठ वाजता झालेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये असा : सातारा ९.७२, महाबळेश्वर ५७.४८, जावळी २५.९३, पाटण ४.०९, कºहाड ८.२३, कोरेगाव ०.६७, खटाव १.१२, खंडाळा १.१५. फलटण, माण, वाई तालुक्यात शून्य मिलीमीटर पाऊस झाला.