राज ठाकरेंना आवडले महाबळेश्वरचे शूज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 06:46 PM2018-05-28T18:46:04+5:302018-05-28T18:46:04+5:30
महाराष्ट्राचे नंदनवन असलेल्या महाबळेश्वरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे कुटुंबीयांसह विश्रांतीसाठी दाखल झाले आहेत.
महाबळेश्वर : महाराष्ट्राचे नंदनवन असलेल्या महाबळेश्वरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे कुटुंबीयांसह विश्रांतीसाठी दाखल झाले आहेत. सोमवारी दुपारी त्यांनी मुख्य बाजारपेठेतून फेरफटका मारला. तसेच एका दुकानातून त्यांनी शूज व चपलाही खरेदी केल्या. दरम्यान, पर्यटनस्थळी आलेल्या अनेक पर्यटकांनी ठाकरे यांच्यासोबत सेल्फीही काढला. राज ठाकरे सध्या महाराष्ट्राच्या दौºयावर आहेत. रविवारी दुपारी कोकण दौरा आटोपून ते महाडमार्गे महाबळेश्वरला विश्रांतीसाठी सहकुटुंब दाखल झाले. ते या ठिकाणी चार दिवस मुक्काम करणार असून, त्यांचा हा खासगी दौरा आहे.
दरम्यान, सोमवारी दुपारी बारा बाजता राज ठाकरे यांनी पत्नी शर्मिला ठाकरे व मुलगी उर्वशी ठाकरे यांच्यासमवेत बाजारपेठेतून फेरफटका मारला. यावेळी मनसेचे नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, सिनेअभिनेते विनय येडेकर आदी उपस्थित होते. चपलांसाठी प्रसिद्ध असलेल्या एका दुकानाला राज यांनी भेट दिली. तसेच चपला व शूजही खरेदी केले. त्यांना पाहण्यासाठी बाजारपेठेत स्थानिक नागरिकांची गर्दी उसळली होती. दरम्यान, राज यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी स्थानिकांसह पर्यटकांनीची झुंबड उडाली होती. मंगळवारी सकाळी ते श्री क्षेत्रमहाबळेश्वर व प्रतापगडला भेट देणार आहेत.