अन् राजेंनी जोडले हात!
By Admin | Published: May 17, 2014 12:23 AM2014-05-17T00:23:34+5:302014-05-17T00:23:46+5:30
सातारा : मतमोजणीच्या सरतेशेवटी जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी उदयनराजेंसह इतर सर्व उमेदवारांची एकूण मते वाचून दाखविली.
सातारा : मतमोजणीच्या सरतेशेवटी जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी उदयनराजेंसह इतर सर्व उमेदवारांची एकूण मते वाचून दाखविली. अपक्ष उमेदवार अभिजित बिचुकले यांची मते पुकारताच उदयनराजेंनी दोन्ही हात जोडून कपाळावर टेकवले. जिल्हाधिकारी प्रत्येक उमेदवाराचे नाव घेऊन मतांची आकडेवारी स्पष्ट करत असताना उदयनराजे गंभीर झाले होते. या आकडेवारीबाबत अॅड. बनकरांकडे बघून त्यांनी कुजबूजही केली. बिचुकलेंचे नाव पुकारताच उदयनराजेंच्या चेहर्यावर स्मितहास्य खुलले! त्यांनी त्याच भावनेत हात जोडून ते कपाळावर टेकवून हलकीशी मानही हलविली. मतमोजणी कक्षात दुपारी अखेरच्या फेरीनंतर खासदार उदयनराजे भोसले यांचे आगमन झाले. कल्पनाराजे भोसले, दमयंतीराजे भोसले, नगराध्यक्षा सुजाता राजेमहाडिक, ‘साविआ’चे पक्षप्रतोद अॅड. दत्ता बनकर, नगरसेविका स्मिता घोडके, नगरसेवक भालचंद्र निकम, सुनील काटकर, राजू गोडसे, जिल्हा परिषद सदस्य संदीप शिंदे, शिरीष चिटणीस, चंद्रशेखर घोडके, राजू गोरे, श्रीकांत आंबेकर यांच्यासह इतर कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते. जिल्हाधिकार्यांनी उदयनराजेंना विजयाचे प्रमाणपत्र दिले. (प्रतिनिधी)