इंदूरच्या कालगावडे राजांनी घेतले शंभू महादेवाचे दर्शन-घोड्यावर बसून आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:07 AM2018-03-28T00:07:18+5:302018-03-28T00:07:18+5:30

दहिवडी : इंदूर राजघराण्याचे वारस कालगावडे राजे यांनी मंगळवारी शिखर शिंगणापूर येथे चैत्र शुद्ध

Raja's arrival in the Kalgaon of Indore arrived by sitting on the Darshan-Horse of Shambhu Mahadev | इंदूरच्या कालगावडे राजांनी घेतले शंभू महादेवाचे दर्शन-घोड्यावर बसून आगमन

इंदूरच्या कालगावडे राजांनी घेतले शंभू महादेवाचे दर्शन-घोड्यावर बसून आगमन

googlenewsNext
ठळक मुद्देशिखर शिंगणापुरात ‘हर-हर महादेव’चा जयघोष

 दहिवडी : इंदूर राजघराण्याचे वारस कालगावडे राजे यांनी मंगळवारी शिखर शिंगणापूर येथे चैत्र शुद्ध एकादशीला मंगळवारी रितीरिवाजाप्रमाने घोड्यावरून बसून वाजत-गाजत येऊन शंभू महादेवाचे दर्शन घेतले. तसेच मानाप्रमाणे या राजाने पादत्राणे घालून गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतले.
चैत्र शुद्ध अष्टमीला शिव-पार्वती विवाह सोहळा पार पडला. आख्यायिकेनुसार याविवाह सोहळ्याला त्याकाळी इंदूरच्या राजाला लग्नाचे निमंत्रण दिले गेले नव्हते. म्हणून एकादशी दिवशी येऊन निमंत्रण दिले नसल्याने देवाचा निषेध केला होता. आतापर्यंत चालत आलेल्या परंपरेनुसार कालगावडे राजे हे त्यांचे वंशज घोड्यावरून पायात पादत्राणे (ही पादत्राणे फक्त एकच दिवस घातली जातात) घालून थेट मंदिराच्या गाभाºयात जाऊन दर्शन घेऊन भक्तिरुपी निषेध करतात.
कालगावडे राजांनी मंगळवारी सकाळी पुष्कर तलावात स्नान केले. त्यानंतर उमाबनातील नांद्रुकीच्या झाडाखाली बसून कांदा, चटणी आणि भाकरी खाल्ली व न्याहारी केली. इंदूर राजघराणेचे वारसदार सुखदेव नानासाहेब कालगावडे (वय ७३, रा. माळेगाव पो. राक्षी ता. शेवगाव, जि. अहमदनगर) यांनी पादत्राणासह मंदिरात जाऊन शिवलिंगावर बेल, फूल, दवणा विभूती भस्म वाहिले व माना-पानाप्रमाणे दर्शन घेतले.
शिवभक्त एकादशीनिमित्त उपवास करतात. मात्र, राजे यादिवशी न्याहारी करतात. रितीरिवाजाप्रमाणे कालगावडा राजांनी मंगळवारी पारंपरिक पद्धतीने घोड्यावरून येऊन दर्शन घेतले. महादेवाच्या मंदिरात जाऊन त्यांच्याबरोबर आलेल्या भाविकांनी महाप्रसाद घेतला. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कालागावडे राजे यांच्याबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे नव्वद गावांतील भक्त भाविक त्यांच्यासमवेत दरवर्षी येतात. वरूर येथील दादासाहेब वावरे यांचा कुंचला धरण्याचा मान असतो. दर्शनास जात असताना प्रशासनाचे कोणतेही सहकार्य मिळत नाही, याची खंत वाटते. कालागावडे राजे हे एकादशीच्या अगोदर आपल्या लवाजम्यासह शिंगणापुरात दाखल होत असतात. ते गावाच्या वेशीच्या बाहेर डोंगरावर मुक्कामी असतात. घोड्यावर बसून जात असताना गर्दीमधून मार्ग काढताना आमची व सहकाºयांची दमछाक होत असते, अशी प्रतिक्रिया कालगावडे राजा यांनी दिली.

मानाच्या कावडी आज येणार
महादेवाला धार घालण्यासाठी भाविकांच्या उपस्थितीत कावडी मुंगी घाट चढून येतात. शेवटी प्रसिद्ध तेल्या बुते यांची कावड येते, ती रात्री उशिरा मंदिरात पोहोचते व कावडीसोबत आणलेल्या पाण्याची धार घालते. त्यानंतर भाविक घराकडे वळतात. हा कार्यक्रम बुधवारी होणार आहे.

माण तालुक्यातील शिखर श्ािंगणापूर येथे बुधवारी इंदूरच्या राजघराण्याचे वारस कालगावडे राजे यांनी घोड्यावरून आले. त्यानंतर पादत्राणे घालून मंदिराच्या गाभाºयात जाऊन दर्शन घेतले.

Web Title: Raja's arrival in the Kalgaon of Indore arrived by sitting on the Darshan-Horse of Shambhu Mahadev

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.