आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी परीक्षक म्हणून राजभूषण सहस्रबुद्धे यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:28 AM2021-06-02T04:28:36+5:302021-06-02T04:28:36+5:30

सातारा : पोलंड देशातील ६१व्या प्रतिष्ठाप्राप्त कॅक्रो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात परीक्षण करण्याची संधी चित्रपट दिग्दर्शक-निर्माते राजभूषण सहस्रबुद्धे यांना मिळाली ...

Rajbhushan Sahasrabuddhe selected as Examiner for International Film Festival | आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी परीक्षक म्हणून राजभूषण सहस्रबुद्धे यांची निवड

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी परीक्षक म्हणून राजभूषण सहस्रबुद्धे यांची निवड

Next

सातारा : पोलंड देशातील ६१व्या प्रतिष्ठाप्राप्त कॅक्रो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात परीक्षण करण्याची संधी चित्रपट दिग्दर्शक-निर्माते राजभूषण सहस्रबुद्धे यांना मिळाली आहे. ही निवड फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल सिनेक्लब यांच्याकडून करण्यात आली.

या महोत्सवात संपूर्ण विश्वातून केवळ तीन परीक्षक निवडण्यात आलेले असून यामध्ये सहस्रबुद्धे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. साताऱ्यातील अनुभव फिल्म क्लबचे ते सचिव असून, अनेक माहितीपट आणि लघुपटांची दिग्दर्शन-निर्मिती त्यांनी केलेली आहे. त्याचप्रमाणे अनेक नामांकित हिंदी-मराठी चित्रपटांत त्यांनी काम केले असून, सध्या काही मराठी मालिकांमध्ये ते अभिनेता म्हणून कार्यरत आहेत.

त्यांच्या निवडीबाबत फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीचे नांदगावकर, अमिताव घोष, अनुभव फिल्म क्लबचे अध्यक्ष शिरीष चिटणीस, उपाध्यक्ष अ‍ॅड. गिरीश कुलकर्णी, सहसचिव अ‍ॅड. अमित द्रविड, कोषाध्यक्ष मकरंद जोशी आदी मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले.

Web Title: Rajbhushan Sahasrabuddhe selected as Examiner for International Film Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.