राजे.. तुम्ही यायला हवं होतं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 11:40 PM2017-08-10T23:40:39+5:302017-08-10T23:40:39+5:30

Raje .. You wanted to come! | राजे.. तुम्ही यायला हवं होतं!

राजे.. तुम्ही यायला हवं होतं!

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : मुंबई मराठा मोर्चाकडे खासदार उदयनराजे भोसले यांनी पाठ फिरविल्यानंतर त्यांच्या समर्थकांमधूनच वेगवेगळ्या प्रतिक्रिया जाहीरपणे व्यक्त होऊ लागल्या आहेत. ‘राजे.. तुम्ही यायलाच हवं होतं!’ अशा भाषेत अनेकांनी मतं व्यक्त केली असून ‘राजकीय नेत्यांना या मोर्चात संतप्त भावनांना सामोरं जावं लागणार, हे माहीत असल्यानंच आमच्या राजेंनी हा निर्णय घेतला,’ असंही समर्थन अनेकांनी केलं.
नाशिक येथील राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतर साताºयाचे उदयनराजे अन् कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती या मोर्चाचं नेतृत्व करतील, अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली होती. उदयनराजे यांच्या वेगळ्या स्टाईलची महाराष्ट्रातील तरुणवर्गाला भलतीच क्रेझ असल्यानं बुधवारच्या मुंबई मराठा मोर्चात त्यांच्या एन्ट्रीकडं साºयांचंच लक्ष लागून राहिलं होतं.
उदयनराजे मुंबईतील क्रांती मोर्चाला जाणारच, हे गृहीत धरून बंदोबस्तासाठी खास साताºयावरून पोलिस पथक पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी गेलं होतं. मात्र, ऐनवेळी त्यांनी या पथकाला परत पाठवून देऊन ते स्वत: मात्र पुण्यातच थांबल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान, महाराष्ट्रातील बहुतांश नेते या मोर्चात सहभागी झालेले असतानाही केवळ उदयनराजे हेच मोर्चात न दिसल्यानं आपापल्या गावी परत निघालेल्या मोर्चेकºयांमध्ये हा विषय भलताच चर्चेचा ठरला होता.
म्हणे मोदींनी केली होती विनंती !
उदयनराजे यांचे खास समर्थक असलेल्या साताºयातील राजू गोडसे यांनी बुधवारी रात्री याबाबत एक निवेदनवजा पोस्ट फेसबुकवर टाकली होती. यात त्यांनी म्हटलं होतं की, ‘मोर्चाच्या आदल्या रात्रीपर्यंत स्वत: महाराजांनी संयोजकांशी संवाद साधून चर्चा केली होती. मात्र, तरुणांचा उत्साह पाहता शांतता राखली जावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजेंना मोर्चात न जाण्याची विनंती केल्यामुळेच राजे यात सहभागी झाले नाहीत.’
ही पोस्ट फिरू लागताच संमिश्र भावनांच्या प्रतिक्रिया धडाधड व्यक्त होऊ लागल्या. ‘पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांना धन्यवाद. त्यांना जनतेची काळजी आहे वाटतं,’ अशा शब्दात एका जाणकारानं खोचक मत व्यक्त केलं, तर त्यांना मानणाºया बहुतांश समर्थकांनी, ‘कारण काहीही असो... राजे, तुम्ही मोर्चात यायलाच हवं होतं,’ अशी आर्त साद दिल्याचंही सोशल मीडिया दिसलं.
काहीजणांनी तर या पोस्टला चक्क ‘जोक’ असं म्हणत, आपली भावना व्यक्त केली. दरम्यान, राजे न येण्याच्या कारणाबाबत अनेक प्रतिक्रिया पडत असतानाच ही पोस्ट अकस्मातपणे गायबही झाली. उदयनराजेंचे खास समर्थक म्हणून ओळखल्या जाणाºया राजू गोडसे यांच्या पत्नी दीपाली गोडसे या उदयनराजे गटाकडून साताºयाच्या उपनगराध्यक्षा होत्या.

Web Title: Raje .. You wanted to come!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.