महाराष्ट्र केसरीसाठी राजेंद्र सूळ, प्रवीण सरक नेतृत्व करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 02:36 PM2019-12-18T14:36:14+5:302019-12-18T14:41:04+5:30
जानेवारी महिन्यात पुण्यात होणाऱ्या ६३ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याचे नेतृत्व माती आणि गादी गटातून राजेंद्र सूळ व प्रवीण सरक करणार आहेत. दरम्यान, मंगळवारी रात्री उशिराही विविध गटातील निवड चाचणी झाली.
Next
ठळक मुद्देमहाराष्ट्र केसरीसाठी राजेंद्र सूळ, प्रवीण सरक नेतृत्व करणारसातारा तालीम संघ मैदानावर विविध गटातील निवड चाचणी
सातारा : जानेवारी महिन्यात पुण्यात होणाऱ्या ६३ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याचे नेतृत्व माती आणि गादी गटातून राजेंद्र सूळ व प्रवीण सरक करणार आहेत. दरम्यान, मंगळवारी रात्री उशिराही विविध गटातील निवड चाचणी झाली.
सातारा तालीम संघ मैदानावर मंगळवारी रात्री उशिरा सर्व गटांची निवड चाचणी पार पडली. यामध्ये महाराष्ट्र केसरीसाठीच्या खुल्या गटात गादी विभागात प्रवीण सरक आणि मनोज कदम यांच्यात लढत झाली. यामध्ये सरकने विजय मिळविला. तर माती गटात राजेंद्र सूळने विजय मिळविला. त्यामुळे हे दोघे महाराष्ट्र केसरीसाठी दोन्ही गटातून लढत देणार आहेत.