पंचायत राजसाठी राजीव गांधींचा क्रांतिकारी निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:42 AM2021-05-25T04:42:44+5:302021-05-25T04:42:44+5:30
मलकापूर : शैक्षणिकसह देशातील संगणक क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणण्यासह नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी जवाहर नवोदय विद्यालयांची स्थापना केली. ...
मलकापूर : शैक्षणिकसह देशातील संगणक क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणण्यासह नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी जवाहर नवोदय विद्यालयांची स्थापना केली. देशात पंचायत राज व्यवस्था बळकट करून ग्रामीण भागाला थेट विकासासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचा क्रांतिकारी निर्णय दिवंगत राजीव गांधी यांनी घेतला,’ असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
भारतरत्न राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कऱ्हाड दक्षिण काँग्रेस कमिटी व मलकापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी युवक काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, कऱ्हाड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे, मलकापूरच्या नगराध्यक्ष नीलम येडगे, माजी जिल्हा परिषद सदस्य विद्या थोरवडे, मलकापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र यादव, नगरसवेक सागर जाधव, हणमंत शिंगण, प्रशांत चांदे, आनंदाराव सुतार, किशोर येडगे, नगरसेविका शकुंतला शिंगण, कमल कुराडे, गीतांजली पाटील, स्वाती तुपे, नंदा भोसले, भारती पाटील, आनंदी शिंदे, पूजा चव्हाण, अलका जगदाळे, माजी नगराध्यक्ष मोहनराव शिंगाडे, गजानन आवळकर, साहेबराव शेवाळे, महादेव शिंदे तसेच यशवंत कोविड सेंटरचे कार्यवाहक डॉ. प्रमोद जाधव व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते यशवंत कोविड सेंटर, कऱ्हाड येथे कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळे व मास्कचे वाटप करण्यात आले. तसेच राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्याच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.
फोटो ओळी :
२४ मलकापूर
दक्षिण काँग्रेस कमिटी व मलकापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.
(छाया : माणिक डोंगरे)
===Photopath===
240521\dsc_0442.jpg
===Caption===
फोटो कॕप्शन
दक्षिण काँग्रेस कमिटी व मलकापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात भारतरत्न स्व. राजीव गांधी यांचे पुण्यतिथी दिनानिमित्त प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. (छाया - माणिक डोंगरे)