कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान ईद अत्यंत साधेपणाने : जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:40 AM2021-05-12T04:40:53+5:302021-05-12T04:40:53+5:30
सातारा : मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याचा प्रारंभ झाला असून दि. १३ किंवा १४ मे रोजी (चंद्रदर्शनावर अवलंबून) रमजान ...
सातारा : मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याचा प्रारंभ झाला असून दि. १३ किंवा १४ मे रोजी (चंद्रदर्शनावर अवलंबून) रमजान ईद (ईद उल फित्र) साजरी केली जाणार आहे. रमजान ईद साधेपणाने साजरी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान ईदकरिता मुस्लिम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपआपल्या घरातच साजरे करून ब्रेक द चेन आदेशचे काटेकोर पालन करावे. नमाज पठणाकरिता मशिदीत तसेच मोकळ्या जागे एकत्र येऊ नये. तसेच दि. २० एप्रिल, ९ मे व १४ एप्रिल २०२१ रोजीच्या आदेशांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहील.