रहिमतपूर येथे रमाई घरकुल सदनिकेचे जलसंपदा मंत्र्यांच्या हस्ते आज उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:55 AM2021-01-02T04:55:22+5:302021-01-02T04:55:22+5:30
रहिमतपूर : रहिमतपूर नगरपरिषदेच्यावतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी रमाई घरकुल सदनिका व भाजी मंडईची इमारत उभारण्यात आली आहे. ...
रहिमतपूर : रहिमतपूर नगरपरिषदेच्यावतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी रमाई घरकुल सदनिका व भाजी मंडईची इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीचे उद्घाटन आज, शनिवारी दुपारी तीन वाजता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना अतिरिक्त कामाच्या निधीतून रमाई आवास योजनेंतर्गत भव्य घरकुल इमारत उभारण्यात आली आहे. यासह संरक्षक भिंत, पेवर ब्लॉक, आदर्श विद्यालय ते बेघरवस्ती इमारतीपर्यंत खडीकरण, आरसीसी गटार, पाणी पुरवठ्यासाठी दोन लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी व पाईपलाईन, रमाई घरकुल योजनेतील ४८ लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. नवीन भाजी मंडई इमारतीसाठी निधी खर्च करण्यात आला आहे. या दोन वास्तूंचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील भूषविणार आहेत. नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, सहायक आयुक्त समाज कल्याणचे नितीन उबाळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, चित्रलेखा माने-कदम, मुख्याधिकारी संजीवनी दळवी, नगराध्यक्ष आनंदा कोरे, उपनगराध्यक्षा सुरेखा माने, सर्व नगरसेवक, नगरसेविका, आदींची प्रमुख उपस्थित राहणार आहे.
०१रहिमतपूर जाहिरात फोटो
फोटो : रहिमतपूर (ता. कोरेगाव) येथे रहिमतपूर नगरपरिषदेने रमाई घरकुल योजनेच्या माध्यमातून भव्य इमारत बांधली आहे.