रामनगर शाळेच्या भिंती लागल्या बोलू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 02:06 PM2019-03-26T14:06:23+5:302019-03-26T14:08:02+5:30

तरुणाईला व्यक्त व्हायला, चांगली कृती करण्यासाठी एखादं व्यासपीठ मिळालं की काय किमया घडते, याचा साक्षात्कार रामनगर आणि पानमळेवाडी परिसरातील ग्रामस्थांना आला. यावर्षीची धुळवड गावातील तरुणाईने रामनगरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या भिंतींवर बोलकी चित्रे साकारून साजरी केली. या उपक्रमाचे आता कौतुक होत आहे.

Ramnagar school walls should talk! | रामनगर शाळेच्या भिंती लागल्या बोलू !

रामनगर शाळेच्या भिंती लागल्या बोलू !

googlenewsNext
ठळक मुद्देचित्रे रेखाटून तरुणाईकडून धुलिवंदनचा सण साजरारामनगर शाळेच्या भिंती लागल्या बोलू !

सातारा : तरुणाईला व्यक्त व्हायला, चांगली कृती करण्यासाठी एखादं व्यासपीठ मिळालं की काय किमया घडते, याचा साक्षात्कार रामनगर आणि पानमळेवाडी परिसरातील ग्रामस्थांना आला. यावर्षीची धुळवड गावातील तरुणाईने रामनगरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या भिंतींवर बोलकी चित्रे साकारून साजरी केली. या उपक्रमाचे आता कौतुक होत आहे.

याबाबत माहिती अशी की, अमृत एकता मंडळाचे कार्यकर्ते आणि शाळेच्या विद्यार्थ्यांनी धूलिवंदनाच्या एक दिवस अगोदरच शाळेच्या भिंती स्वच्छ करून कार्यक्रमाची जय्यत तयारी केली होती. तर शुक्रवारी सकाळी आठ वाजता शाळेच्या भिंतींचे रूप पालटायला सुरुवात झाली.

याला कारण म्हणजे अरविंद गवळी कॉलेजचे विद्यार्थी आणि गावातील तरुणांनी भिंतीवर चित्रे रेखाटली. ही चित्रे साकारताच रुक्ष भिंती जिवंत भासू लागल्या. या तरुणांचा उत्साह पाहून शिक्षक आणि ग्रामस्थांनी चहा- नाष्ट्यापासून अगदी जेवणाचीही सोय शाळेतच केली. दुपारनंतर तर जसजसे चित्रात रंग भरले जाऊ लागले, तसे शाळेच्या परिसरात चित्रे पाहायला लोकांनी गर्दी केली.

या उपक्रमाची संकल्पना आणि संयोजन पुण्याच्या सांस फाउंडेशनच्या वतीने सत्यशील शिंदे यांनी केले होते. तर तरुणांना मार्गदर्शन आणि सहकार्य करण्यासाठी पुणे येथील चित्रकार अनिकेत जऱ्हाड, वैभव ठाकरे उपस्थित होते.
मुख्याध्यापिका सुरेखा शिंदे, श्रीकांत माने, रेखा शेलार, अर्चना कोळसुरे यांच्यासह सर्वच शिक्षकांनी चित्रांची निवड, रचना करण्याबरोबरच चित्रांमधे रंग भरून उपस्थितांचा उत्साह वाढवला.

रामनगरचे सरपंच अमोल गोगावले यांनी विधायक कामांसाठी तरुणाईचा जोश आणि उत्साह वृद्धिंगत होण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तर उपक्रमाची सांगता सातारा शिक्षक बँकेचे संचालक दत्तात्रय कोरडे यांनी आभार मानून केली.

Web Title: Ramnagar school walls should talk!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.