मधमाश्यांच्या हल्ल्यामागे खोडसाळपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 11:22 PM2019-04-07T23:22:13+5:302019-04-07T23:22:18+5:30
दिलीप पाडळे । लोकमत न्यूज नेटवर्क पाचगणी : अलीकडच्या एक-दीड महिन्याच्या कालावधीत चवताळलेल्या आगे मोहोळच्या मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यांच्या घटना ...
दिलीप पाडळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पाचगणी : अलीकडच्या एक-दीड महिन्याच्या कालावधीत चवताळलेल्या आगे मोहोळच्या मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यांच्या घटना अनेक घडल्या आहेत, याचे प्रमाण खूपच वाढले आहे. शनिवारी पाचगणीच्या टेबललँडवर पर्यटकांवर मधमाश्यांनी पुन्हा हल्ला केला; पण स्थानिकांच्या मते एखादा खोडसाळ पर्यटक दगड मारत असल्यानेच असे हल्ले होत असावेत.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी परिसरात घनदाट झाडी, खोल दरी यामुळे मोठ्या प्रमाणावर मोहोळ बसत असते. मधुमक्षिका पालन हाही येथील एक प्रमुख उद्योग बनला आहे. या परिस्थितीत गेल्या काही दिवसांमध्ये मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात पर्यटक जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. ही घटना अधिकच तीव्र झाल्याने एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या पर्यटन हंगामावर त्याचा परिणाम होऊ नये. पाचगणी परिसरात टेबललँड, कड्या कपारीत व झाडे झुडपात अनेक ठिकाणी आगे मोहोळची पोळी आहेत. पर्यटक व स्थानिक व्यावसायिकांच्या दृष्टीने मानवी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संबंधित प्रशासनाने भयमुक्त टेबललँड पॉर्इंट करण्याकरिता वेळीच पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
काही दिवसांपूर्वी जावळी तालुक्यातील सुलेवाडी येथे शेतात काम करण्यास गेलेल्या शांताराम रांजणे या शेतकऱ्यांवर मधमाश्यांनी हल्ला केला होता. यामध्ये या शेतकºयाला आपला नाहक जीव गमवावा लागला आहे. ही घटना ताजी असतानाच रामवाडी, टोपेवाडी येथे रक्षाविसर्जन, अंत्यसंस्कारावेळी या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित लोकांवर मधमाश्यांनी हल्ला केला होता.
सगळीकडे नवीन पानांफुलांचे प्रमाण जास्त आहे. या फुलांमधून परागकण गोळा करण्यासाठी मधमाश्या एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी प्रवास करीत असतात. सुरक्षित ठिकाण पाहून मधमाश्या मोहोळ तयार करतात. सामान्यपणे मधमाश्यांचे मोहोळ मानवी संपर्क येऊ नये, अशा ठिकाणीच असतात. परंतु एखादेवेळी मनुष्य मोहोळाजवळ आल्यास माश्यांना धोक्याची जाणीव होते. मोहोळास धोका आहे, असा इशारा राणीमाशी आपल्या सैनिकी माश्यांना देत. या माश्या फक्त हालचालींवर लक्ष ठेवून धोका संभावित असल्यास या माश्या आक्रमक होत तुटून पडतात. त्यानंतर कामगार माश्या त्यांच्या मोहोळाजवळ असलेल्या मनुष्यांवर हल्ला करतात, अशी माहिती वन्यजीव संशोधक अभ्यासक दीपक चिकने यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
सुगंध, तेलाच्या वासांनीही हल्ला
मधमाश्यांची घ्राणेंद्रिये अत्यंत संवेदनशील असतात. तीव्र स्वरुपाचा सुगंध आल्यास माश्या विचलित होतात. मोहोळ असलेल्या ठिकाणी तीव्र सुगंध किंवा तेल लावलेली व्यक्ती गेल्यास मधमाश्या अशा व्यक्तीवर हल्ला करण्याची शक्यता जास्त असते.
मधमाश्यांची सीमारेषा निश्चित
मधमाश्या या संवेदनशील असण्यासोबतच त्यांची विशिष्ट सीमारेषा ठरलेली असते. एका मोहोळावरील मधमाश्या या त्यांनी निश्चित केलेल्या परिघातच राहतात. साधारपणे मधमाश्या या परिघाचे उल्लंघन करीत नाहीत.
धूर निघाल्यास
मधमाश्यांच्या परिघात धूर झाल्यास त्या दिशेने धोक्याची तीव्रता ओळखून या माश्या अतिक्रमण करतात.
काही मध व मधमाश्या खाणारे पक्षी पोळ्यास इजा पोहोचवतात. त्यामुळे आक्रमक झालेल्या मधमाश्या त्यावेळेस त्यांच्या समोर येणाºयावर हल्ला करतात.
हल्ला झाला तर वेळीच काळजी घ्यावी
आगी मोहोळच्या मधमाश्यांनी हल्ल्यात जखमी झालेल्यांनी प्रथम माशी चावलेल्या ठिकाणची कूस (नांगी) काढावी. ज्या ठिकाणी आग होत आहे, त्याठिकाणी बर्फ लावावा म्हणजे आग शांत होते. जास्तच त्रास होत असल्यास डॉक्टरी उपचार द्यावेत.
मधमाशी चावली असता जागेवर कोणतीही हालचाल न करता स्थब्ध उभे राहावे, तसेच मपलेर, टॉवेलनी तोंड झाकून घेणे. अन्यथा त्यांच्या एक किलोमीटरच्या परिक्षेत्रा बाहेर वाºयाच्या विरुद्ध दिशेने पाळावे. म्हणजे माश्या त्यांच्या परिक्षेत्राबाहेर येत नाहीत.