रणजितसिंह देशमुख यांच्या पाठीमागे पक्षाची ताकद उभारणार : पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:39 AM2021-02-16T04:39:56+5:302021-02-16T04:39:56+5:30

औंध : ‘काँग्रेसला त्यागाचा इतिहास आणि सव्वाशे वर्षांची परंपरा आहे. भविष्यात माण, खटाव तालुक्यात काँग्रेसची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवून पक्ष ...

Ranjit Singh will build the strength of the party behind Deshmukh: Patole | रणजितसिंह देशमुख यांच्या पाठीमागे पक्षाची ताकद उभारणार : पटोले

रणजितसिंह देशमुख यांच्या पाठीमागे पक्षाची ताकद उभारणार : पटोले

googlenewsNext

औंध : ‘काँग्रेसला त्यागाचा इतिहास आणि सव्वाशे वर्षांची परंपरा आहे. भविष्यात माण, खटाव तालुक्यात काँग्रेसची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवून पक्ष मजबूत करा. तुमच्या पाठीशी काँग्रेसची ताकद उभी करू,’ अशी ग्वाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी दिली.

नानासाहेब पटोले यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हरणाई सूतगिरणीचे संस्थापक माण खटावचे नेते रणजितसिंह देशमुख यांनी नुकतीच भेट घेतली, यावेळी ते बोलत होते.

पटोले म्हणाले, ‘कोणाच्या जाण्यामुळे पक्ष संपत नाही. सर्वसामान्य माणूस काँग्रेसच्या पाठीशी आहे. माण-खटावमधील स्वाभिमानी कार्यकर्ते काँग्रेसच्या विचारापासून दूर जाणार नाहीत. रणजितसिंह देशमुख यांच्यासारखे आश्वासक नेतृत्व पक्षाला या मतदारसंघात मिळाले आहे. सामान्य माणसाच्या हिताची कामे करून पक्षाची विचारधारा भक्कम करूया. माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील विकासासाठी राज्य शासनाची ताकद देशमुख यांच्या पाठीशी उभी केली जाईल.’

प्रतिक्रिया

आगामी काळात काँग्रेस पक्षाच्या विचार धारेपासून दुरावलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान करून त्यांना प्रवाहात सामील करून घेण्यासाठी गाव आणि वाडीवस्तीपर्यंत जाऊन काम करणार आहे. पक्षाने दिलेल्या संधीचे सोने करून माण-खटाव मतदारसंघात काँग्रेसला वैभव प्राप्त करून देणार आहे.

- रणजितसिंह देशमुख.

फोटो

१५अौंध-रणजितसिंह देशमुख

राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर रणजितसिंह देशमुख यांनी नानासाहेब पटोले यांचा सत्कार केला.

Web Title: Ranjit Singh will build the strength of the party behind Deshmukh: Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.