कऱ्हाड तालुक्यातील ७५ शाळा आयएसओ मानांकन

By Admin | Published: March 7, 2017 05:32 PM2017-03-07T17:32:03+5:302017-03-07T17:32:03+5:30

कºहाडचे नाव राज्यभर, दिवंगत यशवंतराव चव्हाण स्वच्छ शाळा व सुंदर शाळा ग्रामस्पर्धेचे बक्षीस वितरण,

Ranking of ISO 75 schools in Karhad taluka | कऱ्हाड तालुक्यातील ७५ शाळा आयएसओ मानांकन

कऱ्हाड तालुक्यातील ७५ शाळा आयएसओ मानांकन

googlenewsNext

कऱ्हाड तालुक्यातील ७५ शाळा ह्यआयएसओ

मानांकन
$ि

कऱ्हाड :
$कऱ्हाड तालुक्यातील ७५ शाळा ह्यअह्ण श्रेणीमध्ये आहेत तर ७५ शाळांना आतापर्यंत ह्यआयएसओह्ण मानांकन मिळालेले आहे. शिक्षकांनी या शाळांमध्ये आयएसओसह डिजिटल क्लासरूम, ज्ञानरचनावाद, शिक्षणाची वारी, शिक्षण मोहीम यांसारखे आदर्श उपक्रम राबविले आहेत.
.............................
ह्यकऱ्हाड पंचायत समिती व शिक्षण विभागाने राबविलेले उपक्रम राज्याला आदर्शवत आहेत. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यामुळे आज कऱ्हाडचे नाव या क्षेत्रात राज्यभर झाले आहे,ह्ण असे प्रतिपादन कऱ्हाड पंचायत समितीचे सभापती देवराज पाटील यांनी केले.
दिवंगत यशवंतराव चव्हाण स्वच्छ शाळा व सुंदर शाळा ग्रामस्पर्धेचे नुकतेच बक्षीस वितरण, यशोगाथा पुस्तकाचे प्रकाशन व ह्यआयएसओह्ण मानांकन प्राप्त शाळांचा सत्कार कार्यक्रम येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडला. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती डॉ. सुरेखा शेवाळे, जिल्हा परिषद सदस्या विजयमाला जगदाळे, विद्याताई थोरवडे, भाग्यश्री पाटील, नूतन सदस्या शामबाला घोडके, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, गटशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, पंचायत समिती सदस्या ज्योती गुरव, रुपाली यादव, भाऊसाहेब चव्हाण आदींसह पंचायत समिती सदस्या उपस्थित होत्या.
यावेळी पाटील म्हणाले, ह्यकऱ्हाड पंचायत समितीने ह्ययशवंत पंचायत राजह्णमध्ये राज्यात प्रथम तर राजीव गांधी अभियानामध्ये राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला आहे. शिक्षण विभागानेही अनेक उपक्रम राबविलेले आहेत.ह्ण
दिवंगत यशवंतराव चव्हाण स्वच्छ व सुंदर शाळा स्पर्धेमध्ये लहान गटात सवादे शाळा प्रथम, बेघरवस्ती पाल द्वितीय तर खोडजाईवाडी शाळेने तृतीय क्रमांक मिळविला. उत्तेजनार्थमध्ये शिरवडे, सुपने, उंडाळे, रेठरे बुद्रुक, डेळेवाळी या शाळांनी क्रमांक मिळविले.
मोठ्या गटामध्ये साजूर शाळेने प्रथम, तुळसण शाळेने द्वितीय तर जखिणवाडी शाळेने तृतीय क्रमांक मिळविला. उत्तेजनार्थमध्ये सैदापूर, शामगाव, वाजेवाडी, शेरे व मनू या शाळांनी यश मिळविले. या सर्व शाळा व ६१ शाळांना ह्यआयएसओह्ण सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, विजय जाधव, लक्ष्मण जाधव, भाग्यश्री पाटील, रुपाली यादव, राजेंद्र बामणे, भाऊसाहेब चव्हाण, विद्याताई थोरवडे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी शालेय पोषण आहार अधीक्षक विजय परीट, विस्तार अधिकारी व्ही. एम. गायकवाड, जमिला मुलाणी, आनंद पळसे, चंद्रकांत निकम, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांची उपस्थिती होती.
रवींद्र खंदारे यांनी प्रास्ताविक केले. उदय भंडारे यांनी सूत्रसंचालन केले. व्ही. एम. गायकवाड यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

- ...............................

Web Title: Ranking of ISO 75 schools in Karhad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.