मंदिरात कुंकू भरून बायको मानलं; पण खरं लग्न करायचं टाळलं; अखेर महिलेनं..

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 02:04 PM2022-07-27T14:04:48+5:302022-07-27T14:29:00+5:30

संबंधित पीडितेने रीतिरिवाजाप्रमाणे माझ्याशी लग्न कर, असे सांगितले. त्यावेळी त्याने तिला मारहाण केली.

Rape by luring marriage, The woman lodged a complaint at the Satara city police station | मंदिरात कुंकू भरून बायको मानलं; पण खरं लग्न करायचं टाळलं; अखेर महिलेनं..

मंदिरात कुंकू भरून बायको मानलं; पण खरं लग्न करायचं टाळलं; अखेर महिलेनं..

googlenewsNext

सातारा : दोघांची ओळख झाली. त्यानंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. प्रेमाच्या आणाभाका घेतल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. एका मंदिरात जाऊन त्याने तिच्या कपाळावर कुंकूही लावले अन् त्याने तिला बायको मानले; पण खरेखुरे लग्न करायला जेव्हा त्याने टाळले तेव्हा तिने पोलीस ठाणे गाठून त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. ही धक्कादायक घटना साताऱ्यात उघडकीस आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साताऱ्यातील शाहूपुरी परिसरातील भैरोबाचा पायथ्याजवळ राहणाऱ्या शंकर वारंग (वय ४०) याची एका ३३ वर्षीय महिलेशी २०२० मध्ये ओळख झाली. त्यानंतर वारंगने लग्न करण्याचे आमिष दाखवून उंब्रज येथील एका लाॅजवर नेले. याठिकाणी त्याने त्या महिलेवर बलात्कार केला, तसेच १० फेब्रुवारी २०२२ रोजी पाटण तालुक्यातील एका मंदिरात नेऊन पीडितेच्या डोक्यात कुंकू भरले. आजपासून तू माझी बायको आहेस, असे म्हणून त्याने तिचा स्वीकार केला; परंतु त्यानंतर संबंधित पीडितेने शंकर वारंगजवळ रीतिरिवाजाप्रमाणे माझ्याशी लग्न कर, असे सांगितले. त्यावेळी त्याने तिला मारहाण केली.

दरम्यानच्या काळात त्याने लग्नाचे आमिष दाखवून पीडित महिलेवर वारंवार बलात्कारही केला. तो आता लग्न करत नसल्याचे पाहून महिलेने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी शंकर वारंगवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत महिला पोलीस उपनिरीक्षक सी.एस. मोटे या अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Rape by luring marriage, The woman lodged a complaint at the Satara city police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.