रहिमतपुरात फिरणाऱ्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:41 AM2021-05-27T04:41:30+5:302021-05-27T04:41:30+5:30

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर शहरावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाेलिसांकडून ड्रोनद्वारे वॉच ठेवला जात आहे. दरम्यान, विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्या ...

Rapid antigen test of travelers in Rahimatpur | रहिमतपुरात फिरणाऱ्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट

रहिमतपुरात फिरणाऱ्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट

Next

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर शहरावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाेलिसांकडून ड्रोनद्वारे वॉच ठेवला जात आहे. दरम्यान, विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्या तीस लोकांना पकडून रॅपिड अँटिजन टेस्ट केली. यामध्ये एकजण बाधित सापडला आहे.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रहिमतपूरसह परिसरातील गावात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानांचे शटर डाऊन असल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे. पोलिसांनी रहिमतपूर येथील गांधी चौक, बसस्थानक चौक, कोरेगाव फाटा चौक आदी ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. तसेच खासगी गाड्यांचे पथक तयार करून या माध्यमातून परिसरातील प्रत्येक बीटमधील गावात अचानक पाहणी केली जात आहे. रहिमतपूरमध्ये ये-जा करणाऱ्यांची कसून चौकशी केली जात आहे. तसेच विनाकारण फिरणाऱ्यांना पकडून रहिमतपूर येथील क्रीडा संकुलामध्ये नेऊन त्याठिकाणी त्यांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. पंचवीस लोकांपैकी एकजण बाधित सापडला आहे. त्याला उपचारासाठी ब्रह्मपुरी येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ड्रोनद्वारे रहिमतपूरमधील इतर रस्त्यांवर कोण कुठे विनाकारण फिरतंय? कोण दुकान उघडतंय का? यावरही बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. गल्ली-बोळात टोळकी जमवून बसलेले ड्रोनमध्ये दिसताच पोलिसांची गाडी घटनास्थळावर जाऊन संबंधितांची धरपकड करून रॅपिड टेस्ट करत आहे. तसेच शासकीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. नागरिकांनी शासकीय आदेशाचे पालन करावे. विनाकारण घरातून बाहेर पडू नये, अन्यथा दंडात्मक कारवाईबरोबरच रॅपिड टेस्टला सामोरे जावे लागेल, असा इशारा रहिमतपूरचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश कड यांनी दिला आहे.

२६रहिमतपूर

फोटो : रहिमतपूर (ता. कोरेगाव) येथे विनाकारण फिरणाऱ्यांना पकडून क्रीडा संकुलात अँटिजन रॅपिड टेस्ट केली जात आहे. (छाया : जयदीप जाधव)

Web Title: Rapid antigen test of travelers in Rahimatpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.