रस्त्याच्या दुरवस्थेमुळे रामघळ कुबडीतिर्थची व्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 03:19 PM2017-07-31T15:19:34+5:302017-07-31T15:24:19+5:30
चाफळ : पर्यटन तिर्थक्षेत्राचा क वर्ग दर्जा मिळालेल्या चाफळ, ता. पाटण विभागातील कुबडीतीर्थ रामघळीकडे जाणाºया रस्त्याची दुरवस्था झाली आहे. भाविकांना चिखलातून मार्ग काढीत देवदर्शनाला जावे लागत असून खड्डे पडल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पर्यटकांसह भाविकांनी या तिर्थक्षेत्राकडे पाठ फिरवली आहे.

पर्यटन खात्याने क वर्ग दर्जा दिल्यानंतर येथील रस्त्यासह उर्वरीत विकास कामांसाठी भरघोस निधी देवु केला होता. या निधितुन रामघळ परीसराच्या विकासाबरोबर रस्त्याचे काम करण्यात आले होते. २०१४ साली महाबळवाडी ते सडादाढोली दरम्यान ९०० मिटर अंतर रस्त्यावर खडिकरण व डांबरीकरणाचे काम केले. या कामास १९ लाख १९ हजार रुपयाचा निधी मंजुर करण्यात आला होता. वास्तविक बिबिएम, कारपेट करणे, सिलकोट करुन नाले काढण्यासाठी हा निधी मंजुर करण्यात आला. मात्र, रस्त्याकडेला कुठे नालेच दिसत नाहीत. नाले नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर येवुन रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रामघळीपासुन महाबळवाडीपर्यंतच्या रस्त्याचे अंतर साडेतीन किलोमिटर आहे. यातील फक्त ९०० मिटर रस्त्याचे काम डांबरीकरण करण्यात आले आहे. याही रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने पर्यटक परत वळुन थेट उलटा धबधबा पाहण्यास सडावाघापुरला निघुन जात आहेत. त्यामुळे रामघळ व तेथील अल्हादायक परिसर पर्यटकांपासुन वंचित राहत आहे. |