ऊन्हामुळे रसवंती गृह फुलली

By Admin | Published: March 25, 2017 05:14 PM2017-03-25T17:14:28+5:302017-03-25T17:14:28+5:30

तडाखा वाढला : ज्युस, ऊसाचा रस, थंड पेयांना मागणी

Raswanti's house burst due to sunshine | ऊन्हामुळे रसवंती गृह फुलली

ऊन्हामुळे रसवंती गृह फुलली

googlenewsNext

आॅनलाईन लोकमत


ओगलेवाडी, दि. २५ : मार्च महिन्यातच सुर्यनारायण कोपला असल्याने वातावरणात उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उन्हाच्या तडाक्यामुळे घशाला कोरड पडत असल्याने अशात कानावर रसवंतीगृह व गुऱ्हाळावरील घुंगराचा आवाज पडला की, थंडगार ऊसाचा रस पिण्यासाठी प्रवाशी व नागरिकाची पावले आपोआप वळू लागले आहेत.


फेबु्रवारी, मार्च, एप्रिल आणि मे हे चार महिने उन्हाळा ऋतूचे असतात. या चार महिन्यात सुयार्ची उष्णता प्रचंड प्रमाणात वाढते. सध्या तर मार्च महिन्यातच उष्णतेने तीस अंश सेल्सीअसचा टप्पा ओलांडला आहे. अशा या उष्म्यामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे म्हणजे आजारांना आमंत्रण दिल्यासारखे आहे.


उन्हाळ्यात शरीराचे तापमान योग्य राखण्यासाठी थंडगार शितपेयांना खूप मागणी असते.ं यामध्ये जास्तकरून ऊसाचा रस व नारळपाणीही पिले जाते. लिंबू, आलेयुक्त ऊसाचा आयुर्वेदिक रस पिल्याने शरीराचे तापमान योग्य राखण्याचे काम होते. त्याचबरोबर रक्तातील साखरेचे प्रमाणही वाढवून माणसाला फे्र श आणि ताजेतवाणे करीत असतो. वषार्नुवर्षे भारतीयांच्या आवडीचे असणारे हे पेय आजही लोक मोठ्या आवडीने पीत असतात.


या गुऱ्हाळघरांचे वैशिष्टे म्हणजे घुंगराचा मधूर आवाज. गुऱ्हाळाच्या चाकांना लावलेल्या घुंगराच्या मधूर आवाजाने जाणाऱ्या-येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेते. आणि आपल्या अस्तीत्वाची जाणीव करून देते. दूरवरून येणारा आवाज ओळखूनच माणूस आता रस्त घेवूया, असे ठरवत रसवंतीगृहाकडे मोर्चा वळवतो.


विविध कंपन्यांचे शीतपेय हे शरीराला हानी पोहचविणारे असतात. त्यामुळे सध्या अनेक लोक या शितपेयांपासूर दूर राहत आहेत. तसेच या शीतपेयांतील घटकांपासून वजन वाढण्याचाही धोका असल्याने आरोग्याबाबत चोखवळ असलेली आजची तरूणाई या पेयांना नापसंती दर्शवत आहे. तर भारतीय लिंबू सरबत आणि ऊसाचा ताजा रसाला अधिक पसंती दाखवत आहेत. त्यामुळेच घुंगराच्या आवाजाकडे लहानथोर सर्वांचीच पावले आपोआपच वळताना दिसत आहेत.


रस चांगला मात्र, बफार्चे काय?
रसवंती गृहावर मिळणारा रस हा सकस आणि आरोग्यवर्धक असतो. मात्र, हा रस थंड करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बफार्बाबत अनेकांच्या मनात शंका असते. तसेच हा बर्फ फोडण्यासाठी वापरली जाणारी पिशवी आणि हा बर्फ साठवून ठेवण्याची पद्धत ही वेगळीच असते. गोणपटामध्ये ठेवण्यात आलेला बर्फ खाण्यासाठी योग्य असेलच असे नाही. याबाबत मात्र, खात्री देता येत नाही.

Web Title: Raswanti's house burst due to sunshine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.