दर वाढला... कांदा ऐरणी फुटल्या!

By admin | Published: June 29, 2015 10:46 PM2015-06-29T22:46:35+5:302015-06-30T00:20:45+5:30

असे असते सुरक्षा कवच

Rate increased ... onion anvil broke! | दर वाढला... कांदा ऐरणी फुटल्या!

दर वाढला... कांदा ऐरणी फुटल्या!

Next

काद्याशिवाय दैनंदिन आहाराचीही कल्पना करवत नाही. कांद्याचे दर वाढल्यामुळे शेतकरी आनंदी झाले असून, वाढत्या दरामुळे गृहिणींच्या डोळ्यातून पाणी आणले आहे. बाजारपेठेतील वाढत्या दराचा फायदा करून घेण्यासाठी शेतकरी आजवर वखारी (ऐरणी) मध्ये साठवून ठेवलेला कांदा बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. गेल्या महिन्यात कांद्याचे दर मार्केटमध्ये अचानक उतरल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला होता. या उतरलेल्या दरामुळे वखार असलेल्या शेतकऱ्यांनी कांद्याची साठवण करून ठेवली होती. जून महिन्यात अचानक कांद्याचे दर वाढू लागल्यामुळे शेतकऱ्यांच्या साठवणुकीच्या कांद्याकडे शेताच्या बांधावर कांदा व्यापारी फेऱ्या मारू लागले आहेत. खटाव तालुक्यात कांदा उत्पादक ऐरणीत कांदा साठवून ठेवत असल्यामुळे आता काद्यांचे दर तेजीत आले आहेत. त्यामुळे जिकडे-तिकडे वखारी उघडून कांदा निवडण्याचे काम सुरू झाले आहे.गृहिणीच्या रोजच्या वापरातील अविभाज्य असणाऱ्या कांद्याचे दर वाढत असल्यामुळे त्याचे दर २० ते २५ रुपये प्रतिकिलो दराने सुरू झाल्यामुळे आता मात्र गृहिणीच्या स्वयंपाक घरातील बजेट कोलमडत आहे. कांद्याच्या उच्चांकी दराची फोडणी बसल्यामुळे आता अन्नाला चव तरी कशी येणार हा श्रीमंतांबरोबरच सर्वसामान्य आणि नोकरदारांच्या घरात प्रश्न आवासनू निर्माण झाला असल्याचे दिसत आहे.


असे असते सुरक्षा कवच
बांबूच्या कापापासून बनवलेल्या ताटीचा वापर केला जातो. शेतातच चर काढून त्यामध्ये कांदा ओतला जातो. या चरीच्या कडेने सुरुवातीला तिन्ही बाजूंनी ताटीने बंदिस्त करून त्यात कांदा ओतला जातो. कांद्याच्या उपलब्धेनुसार ऐरण बनविलेली असते. ऐरणीसाठी गव्हाचे काड, वैरण तसेच बांबूच्या कळकाचा, सुतळीचा वापर केला जातो. तसेच वैरण व काड ताटीच्या बरोबर वापरला जातो. तसेच ऐरण तयार झाल्यानंतर त्याच्या वरील आच्छादनासाठी वैरण वापरली जाते. तसेच पावसाच्या तडाख्यापासून सुरक्षित राहण्यासाठी सध्या प्लास्टिकच्या कागदांचाही आच्छादन घातले जाते.

कांद्याच्या वाढलेल्या दरामुळे आम्ही शेतकरी समाधानी आहोत. परंतु, कांद्याला प्रत्येक वेळी असा दर मिळतोच असे नाही. बऱ्याच वेळा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कर्जही फेडता आलेले नाही. कांद्याच्या बीयापासून ते कांदा लागवडीपर्यंत शेतकऱ्याला येणारा खर्च त्यानंतर किडीपासून संरक्षण होण्यासाठी मारावे लागणारी किटकनाशके त्याला लागणाऱ्या मजुरीचा खर्च हे सर्व पाहता आता मिळालेला दर योग्य आहे. बऱ्याच वेळा शेतकऱ्याला आपला कांदा चार ते पाच रुपयाने सुध्दा विकावा लागला आहे त्यावेळी उत्पादनासाठी घातलेले पैसे व दर यामध्ये तफावत येते. त्यामुळे हा खर्चाचा ताळमेळ कुठेच बसवता येत नाही. यावर्षात माझ्यासारख्या बऱ्याच शेतकऱ्यांनी ऐरणीत कांदा साठवणुक करुन ठेवला परंतु गारपीट व वादळी पावसात ऐरणीतील निम्मा कांदा वाया गेला आहे.
- दीपक घाडगे,
कांदा उत्पादक शेतकरी, खटाव

Web Title: Rate increased ... onion anvil broke!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.