काँग्रेसच्या वाई तालुकाध्यक्षपदी रवींद्र भिलारे यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:39 AM2021-03-10T04:39:01+5:302021-03-10T04:39:01+5:30
वाई : वाई तालुक्यात काँग्रेस आव्हानात्मक परिस्थितीतून वाटचाल करत असताना, रवींद्र भिलारे यांच्यासारख्या राजकीय वारसा असलेल्या अनुभवी तरुणाकडे पक्षाने ...
वाई : वाई तालुक्यात काँग्रेस आव्हानात्मक परिस्थितीतून वाटचाल करत असताना, रवींद्र भिलारे यांच्यासारख्या राजकीय वारसा असलेल्या अनुभवी तरुणाकडे पक्षाने जबाबदारी दिली आहे. रवींद्र भिलारे हे कृषी पदवीधर असून उद्योजक आहेत. राजकीय कसब पणाला लावून ते काँग्रेसला पुन्हा गतवैभव मिळवून देतील, असे मत व्यक्त केले जात आहे.
तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल काँगेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याहस्ते रवींद्र भिलारे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भिलारे म्हणाले, ‘राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हा वाई तालुका काँग्रेसचे अध्यक्ष असलेले शंकरराव पाटील हे लक्ष्मणराव पाटील यांच्याबरोबर राष्ट्रवादीत गेले. प्रतापराव भोसले यांनी मानसिंगराव भिलारे यांना अध्यक्षपदी संधी दिली. आता मदन भोसले यांच्याबरोबर वाई तालुकाध्यक्ष रोहिदास पिसाळ भाजपमध्ये गेल्यामुळे पुन्हा काँग्रेसवर निष्ठा असलेल्या भिलारे घराकडे पृथ्वीराज चव्हाण यांनी तालुक्याचे अध्यक्षपद दिले आहे.
काँग्रेसच्या वाई तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी कौतुक केले आहे.
फोटो ०९वाई-रविंद्र भिलारे
वाई तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रवींद्र भिलारे यांचा प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी सत्कार केला.