कोरोना उपचारासाठी रवींद्र मांढरे यांची लाखाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:29 AM2021-06-02T04:29:33+5:302021-06-02T04:29:33+5:30

वाई : कोविड साथीने सारेच हवालदिल झाले आहेत. जिथं शासन, प्रशासन थांबलं, काही मर्यादा आल्या, तिथे देणाऱ्याचे हात पुढे ...

Ravindra Mandhare donates Rs 1 lakh for corona treatment | कोरोना उपचारासाठी रवींद्र मांढरे यांची लाखाची मदत

कोरोना उपचारासाठी रवींद्र मांढरे यांची लाखाची मदत

Next

वाई : कोविड साथीने सारेच हवालदिल झाले आहेत. जिथं शासन, प्रशासन थांबलं, काही मर्यादा आल्या, तिथे देणाऱ्याचे हात पुढे आले. याचा प्रत्यय दिला आहे, अभेपुरीच्या (ता. वाई) रवींद्र मांढरे या माजी उपसरपंचांनी. त्यांनी मॅप्रो कोविड हॉस्पिटल व प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांच्या औषधोपचारासाठी १ लाख ५४ हजारांची मदत केली.

कोरोना महामारीचा समर्थपणे मुकाबला करता यावा, गरजू, गरीब रुग्णांना औषधे, आवश्यक वैद्यकीय सामग्री खरेदी करता यावी, यासाठी आमदार मकरंद पाटील अव्याहतपणे प्रयत्न करीत आहेत. शासकीय कर्मचारी, शिक्षक, उद्योजक आदी घटकांना आर्थिक, वस्तूरूप मदतीसाठी ते आवाहन करीत आहेत. हे रवींद्र मांढरे यांनी एका बैठकीत ऐकले आणि तालुका मॅप्रो कोविड हॉस्पिटल, प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना १ लाख ५४ रुपये देणगी देण्याचा विचार पक्का केला. त्यानुसार त्यांनी ही रक्कम वाई तालुक्यातील रुग्णांच्या औषधोपचारासाठी दिली.

वाई येथे या मदतीचा धनादेश आमदार मकरंद पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

या वेळी पंचायत समितीचे उपसभापती विक्रांत डोंगरे, महादेव मसकर, मनीष भंडारे, महेंद्र पुजारी, कृष्णदेव वाडकर, दत्तात्रय भणगे, नाना चिकणे, भगवान मांढरे, महादेव वाडकर, भरत देवराशे, टी. बी. माने आदी उपस्थित होते.

Web Title: Ravindra Mandhare donates Rs 1 lakh for corona treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.