थिएटरच्या संरक्षणासाठी बाउन्सर ‘राजलक्ष्मी’ चालकांचा निर्धार : न भीता चित्रपटागृह सुरूच ठेवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 01:12 AM2018-04-04T01:12:11+5:302018-04-04T01:12:11+5:30

सातारा : सातारा शहरात सुरू असलेल्या एकमेव राजलक्ष्मी थिएटर परिसरात सोमवारी काही युवकांनी धिंगाणा घातला. मात्र, थिएटर चालकांनी या गावगुंडांना न घाबरता थिएटर चालूच ठेवण्याचा निर्धार केला

 Razlakshmi drivers for determination of theater for theater: Nita Bharat | थिएटरच्या संरक्षणासाठी बाउन्सर ‘राजलक्ष्मी’ चालकांचा निर्धार : न भीता चित्रपटागृह सुरूच ठेवणार

थिएटरच्या संरक्षणासाठी बाउन्सर ‘राजलक्ष्मी’ चालकांचा निर्धार : न भीता चित्रपटागृह सुरूच ठेवणार

Next

स्वप्नील शिंदे ।
सातारा : सातारा शहरात सुरू असलेल्या एकमेव राजलक्ष्मी थिएटर परिसरात सोमवारी काही युवकांनी धिंगाणा घातला. मात्र, थिएटर चालकांनी या गावगुंडांना न घाबरता थिएटर चालूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. तसेच त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी बाउन्सर उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.

हुल्लडबाजी आणि फुकट चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहाबाहेर राडा करणाऱ्यांमुळे सातारा शहरात अनेक वर्षांपासून सुरू असलेले राधिका टॉकीज काही वर्षांपूर्वी तर दोन दिवसांपूर्वी समर्थ थिएटर चालकांनी चित्रपटगृह बंद केले. सोमवारी दुपारी राजलक्ष्मी चित्रपटागृहामध्ये आत जाण्यासाठी प्रेक्षकांची गेटजवळ गर्दी झाली होती. कर्मचारी तिकिटे पाहून प्रेक्षकांना आत सोडत असताना काही तरुण तिकीट न दाखवताच आत गेले. त्यांना तिकिटाची विचारणा केली असता कर्मचाºयांशी हुज्जत घालत मारहाण केली. तसेच काचेची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी थिएटरमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्यांचा शोध सुरू केला आहे.

समर्थ टॉकीज पडद्याआड
शाहूकला मंदिराच्या जन्माआधी साताºयात आंनदीबाई घाटे हे एकमेव बंदिस्त थिएटर होते. त्यानंतर त्याचे ‘आनंद’ टॉकीज झाले. कालांतराने त्यानेच ‘समर्थ’ नाव धारण झाले. तेच दोन दिवसांपूर्वी पडद्याआड गेले आहे.
 

उरले फक्त राजलक्ष्मी
सातारकरांच्या अनेक पिढ्यांना चंदेरी दुनियाची सफर घडवणारे आधी चित्रा बंद झाले. त्यानंतर प्रभात मावळला, जयविजयचा दुवा तुटला, कृष्णा आणि राधिका गेले. त्यानंतर आता समर्थ बंद पडल्याने एकमेव राजलक्ष्मी थिएटर लोकांचे मनोरंजन करत आहे.
 

आम्हाला सातारकरांची सांस्कृतिक चळवळ टिकवायची आहे. त्याचबरोबर व्यवसाय चालवायचा असल्याने अनेक आव्हाने येत असतात. त्याला तोंड देण्यासाठी चार बाउन्सर चित्रपटगृहाबाहेर उभे करणार आहे.
-शशी कोर्टिया, व्यवस्थापक, राजलक्ष्मी टॉकीज

Web Title:  Razlakshmi drivers for determination of theater for theater: Nita Bharat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.