वाचनयात्री पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:26 AM2021-07-21T04:26:07+5:302021-07-21T04:26:07+5:30
हिरापूर शाळेत वृक्षारोपण सातारा : कोंडवे केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिरापूर शाळेच्या प्रांगणात आंब्यांच्या रोपांचे रोपण करण्यात आले. ...
हिरापूर शाळेत वृक्षारोपण
सातारा : कोंडवे केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिरापूर शाळेच्या प्रांगणात आंब्यांच्या रोपांचे रोपण करण्यात आले. या वेळी शाळा व्यवस्थापनाच्या अध्यक्षा मनीषा पवार, अंगणवाडी शिक्षिका अनिता जाधव, सारिका जगताप, मुख्याध्यापिका योगिनी पवार, स्वाती चव्हाण उपस्थित होते.
राष्ट्रीय एकलगान स्पर्धा
सातारा : भारत विकास परिषदेच्या सातारा शाखेच्या वतीने प्राथमिक व माध्यमिक शालेय स्तरावर राष्ट्रीय एकलगान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्याने ‘राष्ट्रीय चेतना के स्वर’ या पुस्तकातील हिंदी गीत म्हणत त्याचा तीन ते पाच मिनिटे कालावधीचा व्हिडीओ शाळेमार्फत १ सप्टेंबरपूर्वी पाठवायचा असून त्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. इच्छुकांनी कीर्ती करंदीकर आणि प्रिया इनामदार यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन अनिल काटदरे, किशोर देशपांडे, सुधीर जोशी यांनी केले आहे.
लसीकरण शिबिराची मागणी
सातारा : गुरुवार व मल्हारपेठेतील वयोवृद्ध नागरिकांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील यांच्याकडे केली आहे.
पथदिवे सुरू करण्याची मागणी
सातारा : थकबाकीपोटी राज्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या हद्दीतील पथदिवे बंद करण्यात आले असून ते तत्काळ सुरू करण्याची मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या सातारा कार्यकारिणीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.