तुमच्यासाठी जीव देण्याचीही तयारी, शशिकांत शिंदेंनी मागितली पवारांची माफी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 01:56 PM2021-11-23T13:56:17+5:302021-11-23T14:01:21+5:30

माझ्या पराभवामागे फार मोठं कारस्थान होतं, ते येत्या काळात समोर येईल, माझा गाफीलपणा मला नडला, त्यामुळे माझा पराभव झाला, असं शशिकांत शिंदेंनी म्हटलं.

Ready to give your life for you, Shashikant Shinde apologized to Sharad Pawar | तुमच्यासाठी जीव देण्याचीही तयारी, शशिकांत शिंदेंनी मागितली पवारांची माफी

तुमच्यासाठी जीव देण्याचीही तयारी, शशिकांत शिंदेंनी मागितली पवारांची माफी

Next
ठळक मुद्दे मी एकनिष्ठ कार्यकर्ता असून त्यांच्यासाठी जीव देईन, असे म्हणत आमदार शिंदे यांनी कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं आहे. 

सातारा/मुंबई - सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला. या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. दगडफेक करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, राष्ट्रवादी आणि शशिकांत शिंदे यांच्याच समर्थकांनी ही दगडफेक केली आहे. त्यामुळे, आमदार शशिकांत शिंदे यांनी दगडफेकीबद्दल माफी मागितली आहे.   

साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली आहे. ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यालयावर राष्ट्रवादीचा झेंडा असून कार्यालयात शरद पवार यांचा फोटो आहे. त्याच, कार्यालयावर शशिकांत शिंदेंच्या नावाने घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती. त्यानंतर, आमदार शिंदे यांनी शरद पवार यांची माफी मागत, कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलंय. 

माझ्या पराभवामागे फार मोठं कारस्थान होतं, ते येत्या काळात समोर येईल, माझा गाफीलपणा मला नडला, त्यामुळे माझा पराभव झाला, असं शशिकांत शिंदेंनी म्हटलं. तसेच, माझ्यासाठी शरद पवार आणि अजित पवार यांनी प्रयत्न केले. पण, मी एका मताने पराभूत झालो, तो पराभव मी स्वीकारतो, असेही शिंदेंनी म्हटलं आहे.  ज्या नेत्यांनी मला राजकीय क्षेत्रात उभं केलं, त्या पक्षाविरोधात चुकीची भूमिका घेऊ नका, ही भूमिका योग्य नाही, मी जाहीर माफी मागतो, शरद पवार, अजितदादा, सुप्रिया ताई यांची माफी मागतो, असे शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. भावनेच्या भरात कार्यकर्त्यांनी काही केलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. मी पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे, शरद पवार यांनाही ते माहिती आहे. मी एकनिष्ठ कार्यकर्ता असून त्यांच्यासाठी जीव देईन, असे म्हणत आमदार शिंदे यांनी कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं आहे. 

शशिकांत शिंदेंचा एका मताने पराभव

जिल्हा बँकेच्या जावळी मतदारसंघासाठी एकूण 49 मतदारांनी आपला हक्क बजावला होता. त्यापैकी शशिकांत शिंदे यांना 24 मतं मिळाली असून 25 मतं घेत रांजणेंनी विजय मिळवला आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतील 21 जागांसाठी ही निवडणूक होत असून 10 जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरीत 11 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून पहिला निकाला हाती आला. त्यामध्ये, आमदार शशिकांत शिंदेंचा पराभव झाला आहे. 

दोन दिवसांपासून होता तणाव

जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये जावळी विकास सेवा सोसायटी मतदार संघात तणावपूर्ण वातावरण असतानाच रविवारी मतदानात दिवशीच आमदार शशिकांत शिंदे आणि त्यांचे विरोधी ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झाली होती. यावेळी पोलिसांच्या उपस्थितीतच एकमेकांना अपशब्द वापरणे पर्यंत मजल गेली होती. मोठा अनर्थ व्हायच्या आधीच आमदार शिंदे आणि रांजणे यांनी मध्यस्थी करून समजुतदारपणा दाखवला आणि वाद मिटवला होता. त्यानंतर, निवडणूक निकालानंतर पुन्हा गोंधळ निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी समर्थकांनीच ही दगडफेक केल्याचे सांगण्यात येत आहे.
 

Web Title: Ready to give your life for you, Shashikant Shinde apologized to Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.