ई-पाससाठी कारणे दोनच; रुग्णालय किंवा अंत्यसंस्कार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:02 AM2021-05-05T05:02:39+5:302021-05-05T05:02:39+5:30

सातारा : आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता असून, यासाठी दररोज हजारो अर्ज येत आहेत. या पाससाठी फक्त रुग्णालयात किंवा अंत्यसंस्कारासाठी ...

The reasons for e-pass are twofold; Hospital or funeral! | ई-पाससाठी कारणे दोनच; रुग्णालय किंवा अंत्यसंस्कार!

ई-पाससाठी कारणे दोनच; रुग्णालय किंवा अंत्यसंस्कार!

Next

सातारा : आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता असून, यासाठी दररोज हजारो अर्ज येत आहेत. या पाससाठी फक्त रुग्णालयात किंवा अंत्यसंस्कारासाठी जायचे आहे, ही दोनच कारणे दिली जात आहेत. मात्र, कारण योग्य असेल तरच परवानगी दिली जात आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या संचारबंदीमध्ये सध्या आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी पासची आवश्यकता आहे. सध्या सातारा जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी पाससाठी अर्ज केले जात आहेत. गेल्या आठ दिवसांमध्ये सातारा जिल्ह्यातून पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर, हैदराबाद, नाशिक याठिकाणी जाण्यासाठी १,०२५ लोकांचे ई-पाससाठी अर्ज आले होते. आतापर्यंत ११,३६६ पास देण्यात आले आहेत तर ३,२५७ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.

चौकट : ही कागदपत्रे हवीत

लग्नकार्य असेल तर लग्नपत्रिका, प्रत्येकाचा कोरोना चाचणी अहवाल, हॉस्पिटलचे काम असेल तर त्याची कागदपत्रे, मेडिकलचे काम असेल तर त्याचा पुरावा, प्रवास करणाऱ्या प्रत्येकाचे आधारकार्ड ही कागदपत्रं जोडावी लागत आहेत.

चौकट : २४ ते ४८ तासांत मिळू शकतो पास

‘ई-पास’साठी अर्ज केल्यानंतर त्याची सायबर सेलमध्ये तपासणी केली जाते तसेच जोडलेली कागदपत्रे जर योग्य असतील तर प्रवासाच्या तारखेपर्यंत ४८ ते २४ तास अगोदर मंजुरी दिली जाते.

चौकट : प्रवासासाठीची कारणे

‘ई-पास’साठी अर्ज करताना नागरिक रुग्णालयात नातेवाईकाला पाहण्यासाठी, आमच्या जवळच्या नातेवाईकांचे निधन झाले आहे म्हणून त्यांच्या अंत्यसंस्काराला जाण्यासाठी, लग्नकार्यासाठी तर काही लोक कामाला जाण्याकरिता अर्ज करत आहेत. एकंदरीत हीच कारणे जास्त करुन ‘ई-पास’साठी दिली जात असल्याचे दिसून येत आहे.

चौकट: नाकाबंदी दरम्यान ई-पासची विचारणा होते

जिल्ह्यात सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरजिल्हा प्रवासाला बंदी करण्यात आली आहे. जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना त्याठिकाणी असलेल्या नाकाबंदीला सामोरे जावे लागते. शिवाय जिथे जिल्हा प्रवेश होतो, तेथेही स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला असून, प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे. नाकाबंदीदरम्यान संबंधित पोलीस स्थानकाचा ई-पास आहे का, याची पाहणी केली जात आहे.

चौकट: ‘ई-पास’साठी कसा करावा अर्ज

ई-पास हवा असलेल्या नागरिकांनी ‘covid-19 डॉट पोलीस डॉट इन’ या वेबसाईटवर जाऊन ज्या ठिकाणाहून प्रवास करायचा आहे ते पोलीस आयुक्तालय अथवा जिल्हा पोलीस विभाग निवडावा. त्यानंतर स्वतःचे नाव, कोणत्या तारखेपासून प्रवास करायचा आहे, ते लिहून मोबाईल क्रमांक, प्रवासाचे कारण, वाहन क्रमांक, सध्याचा पत्ता, ई-मेल, प्रवास प्रारंभ ठिकाण ते अंतिम ठिकाण व सोबतच्या प्रवाशांची संख्या याची माहिती द्यावी.

चौकट :

आतापर्यंत किती अर्ज आले १४६२३

आठ दिवसात आलेले अर्ज १०२५

आत्तापर्यंत दिले ई-पास ११३६६

प्रलंबित ०

Web Title: The reasons for e-pass are twofold; Hospital or funeral!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.