सतरा गावांमध्ये ‘रेकॉर्ड ब्रेक’ रुग्णसंख्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:28 AM2021-06-01T04:28:40+5:302021-06-01T04:28:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कऱ्हाड : तालुक्यात कोरोनाचा कहर अद्यापही कायम आहे. आजअखेरची रुग्णसंख्या वीस हजारपेक्षा जास्त असून, एकूण बाधितांपैकी ...

'Record break' in 17 villages! | सतरा गावांमध्ये ‘रेकॉर्ड ब्रेक’ रुग्णसंख्या!

सतरा गावांमध्ये ‘रेकॉर्ड ब्रेक’ रुग्णसंख्या!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कऱ्हाड : तालुक्यात कोरोनाचा कहर अद्यापही कायम आहे. आजअखेरची रुग्णसंख्या वीस हजारपेक्षा जास्त असून, एकूण बाधितांपैकी ५०.८६ टक्के म्हणजेच निम्मे रुग्ण केवळ सतरा गावांमधील आहेत. संबंधित गावांमध्ये ‘रेकॉर्ड ब्रेक’ रुग्णवाढ झाली आहे. काही गावांत दोनशे तर काही गावांमध्ये आठशेपेक्षा जास्त रुग्ण आहेत. त्यातच आजअखेर मृत्यू झालेल्यांचा आकडाही पाचशेवर पोहोचला आहे.

कऱ्हाड तालुक्यात लोकसंख्येच्या तुलनेत बाधितांची सरासरी ३.५४ टक्के तर चाचणीच्या तुलनेत १७.८६ टक्क्यांवर आहे. कोरोनामुक्तीचा दर ८८.४२ टक्क्यांवर असून, मृत्यूदर २.३६ टक्के आहे. सद्यस्थितीत ९.२० टक्के म्हणजेच एकूण १ हजार ९१६ रुग्ण उपचार घेत आहेत. गतवर्षीच्या अखेरीस संक्रमणाचा वेग कमी झाला होता. मात्र, चालूवर्षी फेब्रुवारीपासून रुग्णसंख्या वाढण्यास सुरूवात झाली, ती आजअखेर कामय आहे. गत पाच महिन्यात तालुक्यामध्ये टप्प्याटप्प्याने रुग्णवाढ सुरू आहे. त्यातच एप्रिल महिन्यात साडेचार हजार आणि मे महिन्यात एप्रिलपेक्षा उच्चांकी सहा हजार रुग्णांची वाढ झाली आहे.

सद्यस्थितीत तालुक्यात सुमारे दोन हजार अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आणखी काही दिवसात रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असून, आरोग्य विभागावर प्रचंड ताण असल्याचे दिसून येत आहे.

- चौकट

.. या गावांमध्ये रुग्ण शंभरपेक्षा जास्त

शेणोली, कापील, टेंभू, विरवडे, सुपने, तांबवे, गोटे, वारुंजी, मुंढे, कासारशिरंबे, कालवडे, बेलवडे बुद्रुक, सवादे, ओंड, उंडाळे, येळगाव, कोळे, विंग, पोतले, चरेगाव, खोडशी, तळबीड, वहागाव, किवळ, वडोली निळेश्वर, आटके, इंदोली, पेरले, चोरे.

- चौकट

पाच महिन्यांतील रुग्णवाढ

जानेवारी : ८९

फेब्रुवारी : १३८

मार्च : ५९२

एप्रिल : ४६१६

मे : ६०२३

- चौकट

रेकॉर्ड ब्रेक रुग्णसंख्या

- २०० ते ३००

वडगाव हवेली : २४१

बनवडी : २८४

गोवारे : २३५

कोपर्डे ह. : २१८

पाल : २१५

- ३०० ते ४००

कार्वे : ३१३

शेरे : ३१५

रेठरे बुद्रुक : ३३२

काले : ३८०

कोयना वसाहत : ३१४

- ४०० ते ५००

गोळेश्वर : ४५५

हजारमाची : ४३५

उंब्रज : ४७६

मसूर : ४८९

- ५००पेक्षा जास्त

सैदापूर : ८२४

मलकापूर : २१६८

कऱ्हाड : ४०८४

(सतरा गावांमधील एकूण रुग्णसंख्या १०,५८५)

- चौकट

कऱ्हाड तालुका कोरोना स्थिती

एकूण बाधित : २०,८११

कोरोनामुक्त : १८,४०२

दुर्दैवी मृत्यू : ४९३

उपचाराखाली : १९१६

- चौकट

गावांचा लेखाजोखा

एकूण बाधित : २०१

कोरोनामुक्त : ४१

कन्टेनमेंटमध्ये : १६४

Web Title: 'Record break' in 17 villages!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.