चचेगावसह जखिणवाडीत विक्रमी मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:33 AM2021-01-17T04:33:56+5:302021-01-17T04:33:56+5:30
चचेगावात एकूण मतदान २ हजार ४९२ असून त्यापैकी २ हजार १२९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे सरासरी ८५.४ टक्के ...
चचेगावात एकूण मतदान २ हजार ४९२ असून त्यापैकी २ हजार १२९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे सरासरी ८५.४ टक्के एवढे उत्साही मतदान झाले. येथे पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रभाग १ मध्ये एकूण मतदान ७६४ असून त्यापैकी ६६३ मतदान झाले. त्यामध्ये ३४६ पुरुष व ३१८ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रभाग २ मध्ये एकूण ७३८ मतदान असून त्यापैकी ६६२ मतदान झाले. या प्रभागात ३३५ पुरुष व ३२७ महिलांनी मतदान केले. प्रभाग ३ मध्ये एकूण ४६५ पैकी ३७८ मतदान झाले. त्यामध्ये १८६ पुरुष तर १९२ महिलांनी मतदान केले. प्रभाग ४ मध्ये एकूण ५२५ पैकी ४२६ मतदान झाले. त्यामध्ये २१३ पुरुष व २१३ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला.
जखिणवाडीत २ हजार ८२६ मतदार असून त्यापैकी २ हजार ३८४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सरासरी ८४.३ टक्के मतदान झाले. उत्साही मतदानातून नवीन गावकारभाऱ्याचे भवितव्य मशीनबंद झाले आहे. प्रभाग १ मध्ये एकूण ८०५ मतदान असून त्यापैकी ६९१ मतदारांनी मतदान केले. त्यामध्ये ३५८ पुरुष आणि ३३३ महिलांनी मतदान केले. प्रभाग २ मध्ये ६७५ मतदार आहेत. त्यापैकी ५७६ जणांनी मतदान केले असून त्यामध्ये ३०२ पुरूष व २७४ महिलांचा समावेश आहे. प्रभाग ३ मध्ये ६२५ मतदार असून ५०१ मतदान झाले. त्यामध्ये २५७ पुरुष व २४४ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रभाग ४ मध्ये एकूण ७२१ मतदान आहे. त्यापैकी ६१६ मतदान झाले. ३१७ पुरुष व २९९ महिलांनी मतदान केले.