रेकॉर्डवरील सराईत चोरट्यांकडून घरफोडीचा गुन्हा उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:26 AM2021-06-11T04:26:45+5:302021-06-11T04:26:45+5:30

सातारा : कृष्णानगर, सातारा येथे एका गोडावूनमधून बॅटऱ्या चोरणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सातारा येथील बाॅम्बे ...

Recorded burglary by burglars | रेकॉर्डवरील सराईत चोरट्यांकडून घरफोडीचा गुन्हा उघड

रेकॉर्डवरील सराईत चोरट्यांकडून घरफोडीचा गुन्हा उघड

Next

सातारा : कृष्णानगर, सातारा येथे एका गोडावूनमधून बॅटऱ्या चोरणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सातारा येथील बाॅम्बे रेस्टॉरंट चौकात सापळा लावून अटक केली.

रोहित जितेंद्र भोसले (वय २४), अविनाश राजाराम भिसे (२४), प्रकाश राजेंद्र शेडगे (२२, तिघे रा. प्रतापसिंहनगर, सातारा) अशी चोरट्यांची नावे असून, त्यांच्याकडून छोटा हत्ती टेम्पो, ८ बॅटऱ्या असा ४ लाख ४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी, प्रतापसिंहनगर सातारा येथून बॉम्बे रेस्टॉरंट बाजूकडे पोलीस अभिलेखावरील आरोपी व त्याचा साथीदार हे छोटा हत्ती (एमएच ११ सीएच ५६७४) मधून जलसंपदा विभाग वसाहत कृष्णानगर सातारा येथून चोरलेल्या बॅटऱ्या विक्रीसाठी घेऊन चालले आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्या अनुषंगाने पथकाने बॉम्बे रेस्टॉरंट परिसरामध्ये थांबून सापळा लावला. सायंकाळी सातच्या सुमारास संबंधित वाहन कोरेगाव बाजूकडून सातारा बाजूकडे येताना दिसले. वाहनास थांबवून पाहणी केली असता त्यामध्ये ८ बॅटऱ्या आढळून आल्या. आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी बॅटऱ्या कृष्णानगर येथील जलसंपदा विभागाच्या गोडावूनमधून चोरल्या असून, त्या विक्री करण्याकरिता घेऊन जात असल्याचे सांगितले. या बॅटरी चोरीप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावत तीन सराईतांना जेरबंद केले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, उत्तम दबडे, कांतीलाल नवघणे, अतिष घाडगे, शरद बेबले, साबीर मुल्ला, नितीन गोगावले, मंगेश महाडिक, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, नीलेश काटकर, मुनीर मुल्ला, गणेश कापरे, अमित सपकाळ यांनी केलेली.

Web Title: Recorded burglary by burglars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.