औंध उपविभागातील पाच कोटींची थकीत वीजबिलांची वसुली : सुभाष घाटोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:39 AM2021-04-08T04:39:20+5:302021-04-08T04:39:20+5:30

औंध : वडूज विभागात वीज वितरण कंपनीच्या औंध उपविभागाने बाजी मारत आजअखेर सुमारे पाच कोटींची वीजबिल वसुली केली असून, ...

Recovery of Rs 5 crore overdue electricity bills in Aundh sub-division: Subhash Ghatol | औंध उपविभागातील पाच कोटींची थकीत वीजबिलांची वसुली : सुभाष घाटोळ

औंध उपविभागातील पाच कोटींची थकीत वीजबिलांची वसुली : सुभाष घाटोळ

Next

औंध : वडूज विभागात वीज वितरण कंपनीच्या औंध उपविभागाने बाजी मारत आजअखेर सुमारे पाच कोटींची वीजबिल वसुली केली असून, या वीजबिल वसुलीस शेतकरी, घरगुती व औद्योगिक वीज ग्राहकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, वडूज विभागात औंध उपविभाग अव्वल असल्याची माहिती औंध वीज वितरण कंपनीचे उपअभियंता सुभाष घाटोळ यांनी दिली.

औंध उपविभागातील २६ गावांमधील औंध,पुसेसावळी, वडगाव, गोरेगाव वांगी, उंचीठाणे, पळशी, खरशिंगे, येळीव, करांडेवाडी, गणेशवाडी, नांदोशी, त्रिमली, वडी,कळंबी, जायगाव, भोसरे, अंभेरी, कोकराळे,राजाचे कुर्ले व अन्य गावांचा सहभाग चांगला असल्याची माहिती त्यांनी दिली.

या वसुलीस ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ३१ मार्चपर्यंत मोठ्या प्रमाणात थकबाकी वसूल झाली असल्याची माहिती घाटोळ यांनी दिली.

जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातही वसुलीस चांंगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती देऊन खटाव, वडूज, दहिवडी व औंध या चार उपविभागांत वीजबिल वसुलीमध्ये औंध उपविभाग अव्वल असल्याची माहिती त्यांनी दिली. याकामी सहाय्यक अभियंता रुपेश लादे, ज्ञानेश्वर करे, विशाल पवार, लेखापाल एस. व्ही. जाधव, सुनील इंगळे, एस. एस. जाधव, सर्व जनमित्र कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आहेत.

चौकट

३३ टक्के अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार !

झालेल्या वसुलीमागे अनुदानाचा औंध उपविभागातील २६ गावांतील शेतीपंप कनेक्शनच्या पायाभूत सुविधांसाठी ही रक्कम वापरली जाणार आहे. यामध्ये खराब पोल बदलणे, ट्रान्सफाॅर्मर बदलणे व अन्य साहित्य दुरुस्तीसाठी ही रक्कम वापरली जाणार आहे, अशी माहिती सहायक अभियंता रुपेश लादे यांनी दिली.

Web Title: Recovery of Rs 5 crore overdue electricity bills in Aundh sub-division: Subhash Ghatol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.