शिक्षक बँक भरती अनावश्यक  : बळवंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:25 PM2019-07-24T12:25:22+5:302019-07-24T12:27:55+5:30

शिक्षक बँकेत बहुमताच्या जोरावर अनावश्यक नोकरी भरती होत आहे. या भरतीच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार असून, भरती प्रक्रिया आरबीआय बोर्डाच्या धोरणानुसार होण्यासाठीही आम्ही प्रयत्न करणार असल्याची माहिती शिक्षक बँकेचे माजी चेअरमन बळवंत पाटील यांनी दिली.

 Recruitment of teachers bank unnecessary: Balwant Patil | शिक्षक बँक भरती अनावश्यक  : बळवंत पाटील

शिक्षक बँक भरती अनावश्यक  : बळवंत पाटील

Next
ठळक मुद्दे शिक्षक बँक भरती अनावश्यक : बळवंत पाटील प्रसंगी भरती प्रक्रियेविरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार

सातारा : शिक्षक बँकेत बहुमताच्या जोरावर अनावश्यक नोकरी भरती होत आहे. या भरतीच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार असून, भरती प्रक्रिया आरबीआय बोर्डाच्या धोरणानुसार होण्यासाठीही आम्ही प्रयत्न करणार असल्याची माहिती शिक्षक बँकेचे माजी चेअरमन बळवंत पाटील यांनी दिली.

यावेळी त्यांच्यासोबत अध्यक्ष चंद्रकांत यादव, नवनाथ भरगुडे, रामराव थोरात, सुभाष ढालपे, विजय खांडके, दीपक गिरी, शिवाजी शिवणकर, विजय खरात, द. बा. पवार, ज्ञानबा ढापरे, अशोक पडवळ आणि संजय उबाळे उपस्थित होते.

बळवंत पाटील म्हणाले, शिक्षक बँकेची आर्थिक उन्नती उत्तम चालली आहे. बँकेला होणाऱ्या नफ्यातून सभासदांच्या हिताची धोरणे राबविण्याऐवजी सत्ताधारी भलतीकडेच लक्ष देऊ लागले आहेत. सभासदांकडून कर्ज वसुली उत्तम होत असताना बँकेत नेमक्या कोणत्या विभागात मनुष्यबळ आवश्यक आहे, हा संशोधनाचा भाग आहे. या नोकर भरतीमागे आर्थिक गणितं असली तरी ती उधळवून लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे.ह्ण

Web Title:  Recruitment of teachers bank unnecessary: Balwant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.