सरकारी बस्त्यासाठी लाल कापडाला भाव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 11:19 PM2017-08-22T23:19:50+5:302017-08-22T23:19:50+5:30

Red carpet for the government house! | सरकारी बस्त्यासाठी लाल कापडाला भाव !

सरकारी बस्त्यासाठी लाल कापडाला भाव !

Next



सागर गुजर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : झिरो पेंडन्सीच्या कामामुळे कागदपत्रे ज्या कापडात बांधली जातात, त्या रुमालांना भलतीच मागणी वाढली आहे. हा नवा ‘सरकारी बस्ता’ बांधण्यासाठी गेल्या तीन महिन्यांत तब्बल तीन हजार ८१ रुमालांची मागणी शासकीय कार्यालयांनी टीसीपीसी (ट्रेनिंग कम प्रोडक्शन सेंटर फॉर एक्स सर्व्हिसमन) कडे केली आहे.
शासनाच्या कार्यालयांमध्ये पत्रव्यवहार व इतर महत्त्वाची कागदपत्रे गठ्ठ्यांमध्ये बांधून ठेवलेली आपल्याला पाहायला मिळतात. पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी दिलेल्या ‘झिरो पेंडन्सी’च्या आदेशामुळे या कागदपत्रांच्या गठ्ठ्यावरील धूळ झटकली गेली. तसेच कार्यालयांत इतरस्थ: पसरलेल्या कागदांना शिस्त लागली. ९ जूनला आयुक्तांनी आदेश काढले अन् जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये झिरो पेंडन्सीच्या कामाची एकच लगबग सुरू झाली. रात्री-अपरात्री जागून ही कामे सुरू करण्यात येत होती. जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हाधिकारी, प्रांत अशा कार्यालयांमध्ये कर्मचाºयांचे एक टार्गेट झिरो पेंडन्सी पाहायला मिळत होते. दरवर्षीच्या नियोजनानुसार डिसेंबर महिन्यात सर्व शासकीय कार्यालये झिरो पेंडन्सीची कामे केली जातात. त्यामुळे वर्षाअखेरीस कार्यालयांमध्ये लगबग दिसते. मात्र, आयुक्तांच्या आदेशामुळे जून महिन्यातच शासकीय कार्यालयांमध्ये अभिलेख वर्गीकरणाचे काम वेगाने सुरू झाले होते. येथील टीसीपीसीकडे शासकीय कार्यालयांमार्फत अभिलेख बांधणीसाठी लागणाºया गठ्ठ्यांची आॅर्डर दिली जाते. टीसीपीसीमधून हे रुमाल व इतर साहित्य बनवून दिले जाते. आॅर्डरप्रमाणे कर्मचारी रुमाल बनवून देतात. १ जून ते २० आॅगस्ट या अडीच महिन्यांच्या काळात तब्बल ३ हजार ८१ रुमालांची आॅर्डर मिळाली. त्यापैकी १ हजार ५८१ रुमालांची आॅर्डर पूर्ण करण्यात आली तर उर्वरित १ हजार ५०० रुमालांची आॅर्डर पूर्ण करण्याचे काम सुरू असल्याची माहिती टीसीपीसीतून मिळाली. १९५९ पासून टीसीपीसीतर्फे हे काम केले जाते. १९६५ पर्यंत कागदपत्रे कपाटांवर रचली जात होती. अहमदनगरचे तत्कालीन जिल्हाधिकारी लखिना यांनी अभिलेख वर्गीकरणाचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्यानंतर ही कागदपत्रे रुमालांत बांधली जाऊ लागली.
कागदपत्रे वेगळी, रुमाल वेगळा
कायमस्वरूपी जतन करून ठेवायचे अभिलेखे लाल रुमालात, ३0 वर्षांपूर्वीची कागदपत्रे हिरव्या रुमालात, दहा वर्षांपूर्वीची कागदपत्रे पिवळ्या रुमालात तर एक वर्षानंतर नष्ट करावयाची कागदपत्रे पांढºया रुमालात बांधून ठेवली जातात. रुमालांच्या रंगावरुन त्यातील कागदपत्रे किती जुनी आहेत, त्याचा अंदाज बांधता येतो.

Web Title: Red carpet for the government house!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.