रिफाइंड खाद्यतेल महागले; शेंगदाणा तेलाला मागणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:50 AM2021-06-16T04:50:08+5:302021-06-16T04:50:08+5:30
शेंगदाणा तेलास सर्व तेलांचा राजा समजले जाते. फिल्टर शेंगदाणा तेलामध्ये नैसर्गिक घटक, पोषकतत्त्वे अधिक असतात. यामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण शरीराला ...
शेंगदाणा तेलास सर्व तेलांचा राजा समजले जाते. फिल्टर शेंगदाणा तेलामध्ये नैसर्गिक घटक, पोषकतत्त्वे अधिक असतात. यामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण शरीराला आवश्यक तेवढेच असते. हे तेल नैसर्गिक पद्धतीने बनवलेले व केमिकलविरहित असल्याने पदार्थ रुचकर बनतात. उत्पादनखर्च व उपलब्धता कमी असल्याने दर सातत्याने उंच राहतात. मात्र सध्या रिफाइंड तेल आयातीत वाढ झाली असल्याने व उपलब्धता कमी झाल्याने सर्व रिफाइंड तेलांचे दर जवळपास दुप्पट झाले. याउलट शेंगदाणा पुरेसा उपलब्ध असल्याने या तेलाचे दर त्या प्रमाणात वाढले नाहीत. शेंगदाणा तेल आपल्या रोजच्या खाण्यात वापरणे हे आरोग्यास हितकारक आहे. त्यामुळे बराच मोठा वर्ग शेंगदाणा तेलाकडे वळला असल्याची माहिती चित्ता शुद्ध शेंगदाणा तेलाचे उत्पादक मल्हारपेठ येथील नितीश आॅईल इंडस्ट्रीजचे व्यवस्थापक रवी चव्हाण यांनी दिली.