न्यायालयात गेल्याने ‘आरटीई’ प्रवेश लटकले!, साताऱ्यातील तीन शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला

By प्रगती पाटील | Published: August 11, 2023 04:00 PM2023-08-11T16:00:29+5:302023-08-11T16:01:01+5:30

गरीब, दुर्बल व दुर्लक्षित घटकातील मुलांना प्रवेश देण्यास शाळांनी असमर्थता दाखविल्यानंतर पालकांनी न्यायालायाचा मार्ग अवलंबला

Refusal of schools to admit children from poor, weak and marginalized sections under RTE, Admission was delayed as parents went to court | न्यायालयात गेल्याने ‘आरटीई’ प्रवेश लटकले!, साताऱ्यातील तीन शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला

न्यायालयात गेल्याने ‘आरटीई’ प्रवेश लटकले!, साताऱ्यातील तीन शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला

googlenewsNext

सातारा : आरटीई अंतर्गत प्रवेश न दिल्याच्या विरोधात न्यायालयात गेलेल्या विद्यार्थ्यांचे आरटीई प्रवेश न्यायालयीन बाब म्हणून लटकले आहेत. या प्रकरणाची सुनावणी पुढे गेल्याने पालकांना प्रवेशाचे आदेश मिळविण्यासाठी अजूनही प्रतिक्षा करावी लागणार आहे. साताऱ्यातील तीन शाळांनी प्रवेश न दिल्याने पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

शिक्षणाचा मोफत अधिकार कायद्यांतर्गत गरीब, दुर्बल व दुर्लक्षित घटकातील मुलांना प्रवेश देण्यास शाळांनी असमर्थता दाखविल्यानंतर पालकांनी न्यायालायाचा मार्ग अवलंबला. या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर पुढील तारीख २३ सप्टेंबर मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न अधांतरीत राहणार आहे.

Web Title: Refusal of schools to admit children from poor, weak and marginalized sections under RTE, Admission was delayed as parents went to court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.