कोरोना लसीकरणासाठी नोंदणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:39 AM2021-04-08T04:39:24+5:302021-04-08T04:39:24+5:30
कराड : कोरोनाच्या महामारी संकटाला रोखण्यासाठी लस घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. तालुक्यात लसीकरण गतीने व्हावे म्हणून आता ...
कराड
: कोरोनाच्या महामारी संकटाला रोखण्यासाठी लस घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. तालुक्यात लसीकरण गतीने व्हावे म्हणून आता प्राथमिक उपकेंद्रांमध्येही रोटेशन पद्धतीने लसीकरण सुरू केले आहे. ग्रामस्थांनी त्याबाबत नोंदणी करून याचा लाभ घ्यावा, असे आव्हान तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी केले.
बेलवडे (ता. कराड) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावर आज कोरोना लस देण्यात येत होती. या केंद्राची तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी पाहणी केली. त्यानंतर ते ''लोकमत'' शी बोलत होते .
तहसीलदार वाकडे म्हणाले, तालुक्यात ६४ ठिकाणी सध्या लसीकरण केंद्र सुरू आहेत. त्यात ग्रामीण भागातील सर्व ११ प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू आहे. पण उपकेंद्रांमध्येही रोटेशन पद्धतीने लसीकरण करण्यात येत आहे. सध्या ४५ वर्ष वयापेक्षा अधिक वयाच्या लोकांना प्राधान्याने लस दिली जात आहे .त्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली जाऊ शकते. त्याबरोबर गावोगावी नाव नोंदणीसाठी शिक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत. त्यांच्याकडे नाव नोंदणी करून सहकार्य करावे.
तालुक्यात सध्या दररोज सरासरी ३५०० व्यक्तिंना कोरोना लस दिली जात आहे. नजीकच्या काळात हे प्रमाण अधिक वाढवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे.
फोटो
बेलवडे बुद्रुक (ता. कराड) येथील लसीकरण केंद्राची पाहणी करताना तहसीलदार अमरदीप वाकडे.