मतदार यादीत फोटो नसलेल्यांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:14 AM2021-03-04T05:14:54+5:302021-03-04T05:14:54+5:30
सातारा : मतदार याद्या निरंतर पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीमध्ये ज्या मतदारांचे नाव आहे परंतु फोटो नाही, अशा सर्व मतदारांनी ...
सातारा : मतदार याद्या निरंतर पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीमध्ये ज्या मतदारांचे नाव आहे परंतु फोटो नाही, अशा सर्व मतदारांनी स्वत:चे फोटो व नमुना ८ भरून आपल्या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेत जमा करावेत, अन्यथा आपले नाव मतदार यादीतून वगळण्यात येणार असल्याचे मतदार नोंदणी अधिकारी सातारा विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी कळविले आहे.
मतदारांनी तत्काळ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मार्फत छायाचित्रे देण्याची कार्यवाही करावी अन्यथा नावे वगळण्याची कार्यवाही करण्यात येईल. याबाबत केलेल्या तक्रारींचा विचार केला जाणार नाही. फोटो नसलेल्या मतदारांची यादी राष्ट्रीय केंद्र यांच्या संकेतस्थळावर पाहण्यासाठी उपलब्ध आहे, असेही उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी कळविले आहे.