मृतदेह खाणार्या तरुणाचे यशोधनमध्ये पुर्नवसन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 06:47 PM2021-04-30T18:47:33+5:302021-04-30T18:49:58+5:30
Crimenews Satara : कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी फलटण पालिकेने कोळकी येथील स्मशानभूमी ताब्यात घेतली आहे. तेथे काही दिवसांपूर्वी एक तरुण जळत असलेला सरणावरुन काहीतरी काढून खात असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले होते. त्यानंतर त्याला तेथून हाकलून लावत पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्याचे पूनर्वसन आता वाईतील यशोधन संस्थेत करण्यात आले.
वाई : कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी फलटण पालिकेने कोळकी येथील स्मशानभूमी ताब्यात घेतली आहे. तेथे काही दिवसांपूर्वी एक तरुण जळत असलेला सरणावरुन काहीतरी काढून खात असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले होते. त्यानंतर त्याला तेथून हाकलून लावत पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्याचे पूनर्वसन आता वाईतील यशोधन संस्थेत करण्यात आले.
भूख माणसाला काहीही करायला लावते. पोटातील आग विझवण्यासाठी प्रत्येक जन धडपड असतो. अशातच कोरोना संकटामध्ये अनेक हातावरचे पोट असणार्या लोकाचे जगणे अवघड झाले आहे. या महामारीत अनेकाचे हाल झाले आहेत. असाच धक्कादायक प्रकार फलटण येथे काही दिवसांपूर्वी घडला होता.
कोरोना रुग्णाचे मृतदेह जाळण्यासाठी कोळकी ग्रांमपंचायतची संमाशानभूमी घेतली आहे. या ठिकाणी रोजच कोरोनाने मृत्यू झालेल्यांवर अंत्यविधी केला जातो. या स्माशानभूमीत अंदाजे २० वर्षाचा तरुण मुलगा जळत असणार्या सरणातून काढून काहीतरी खात असल्याचे निदर्शनास आले होते. त्याला नगर पालिकेच्या कर्मचार्यानी हटकले परंतु त्याला लागलेल्या भुकेने तो व्याकुळ झाला होता. त्याला त्या ठिकाणाहून हटकुन पोलिसाच्या ताब्यात देण्यात आले .
त्याचे कोविड काळात पुर्नवसन कोठे करायचे हा प्रश्न प्रशासनापुढे होता. मुख्याधिकाऱ्यांनी यशोधन ट्रस्टचे संचालक रवी बोडके यांचेशी संपर्क करत त्याला यशोधन ट्रस्टमध्ये घेण्याची विनंती केली. रात्री उशीरा पोलिसांनी सर्व कागतपत्राची पुर्तेता केली. त्याची कोरोना चाचणीही करण्यात आली. यामध्ये ती निगेटिव्ह आली आहे.
पोलिस बदोबस्तामध्ये यशोधन ट्रस्टच्या वेळे येथील आश्रमात त्याची सोय करण्यात आली आहे. सकाळी कवठे आरोग्य केंद्रात त्याची वैदकिय तपासणी, कोरोनाची टेस्ट केली आहे. त्याच्यावर मानसोपचाराची गरज असून लवकरच उपचारासाठी सातारा या ठिकाणी घेऊन जाणार असल्याची माहिती रवी बोडके यांनी दिली.