जलस्त्रोतांसाठी पडीक विहिरीचे पुनरुज्जीवन

By admin | Published: July 7, 2016 11:16 PM2016-07-07T23:16:36+5:302016-07-08T01:06:52+5:30

कातरखटाव : चौदाव्या वित्त आयोगातून गाळ काढून खोलीकरण

Rejuvenation of wet well for water resources | जलस्त्रोतांसाठी पडीक विहिरीचे पुनरुज्जीवन

जलस्त्रोतांसाठी पडीक विहिरीचे पुनरुज्जीवन

Next

कातरखटाव : ‘जसे कर्म तसे फळ, या म्हणीप्रमाणे गावकारभाऱ्याने विकास करायची दूरदृष्टी चांगली ठेवली तर निधी कमी पडणार नाही. चौदाव्या वित्त आयोगातून कातरखटाव ग्रामपंचायतीने ‘जलस्रोताचा विकास करण्यासाठी तसेच बौद्ध व मातंग वस्तीचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटावा, यासाठी ओढ्यावरील जुन्या विहिरीचा गाळ काढून खोलीकरण करण्यासाठी दोन लाखांचा उपलब्ध निधी वापरण्यात आला आहे.
उन्हाळ्यात पाणी-पाणी करणाऱ्या गावच्या जनतेच्या समस्या डोळ्यासमोर ठेवून पन्नास ते साठ वर्षांच्या जुन्या विहिरीचे खोलीकरण करण्यात आले आहे. गाळ व दगड काढून पस्तीस फूट खोल खोलीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे खोलीकरण करताच पाण्याचा
प्रवाह सुरू झाला आहे. दुष्काळी व टंचाई परिस्थितीमध्ये विहिरीला
पाणी पाहून ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.
जलस्रोताचा विकास होत असल्यामुळे गावातील दलित व मातंग वस्तीच्या लोकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार नाही. दलित बांधवांना अतिरिक्त पाणी शेतीसाठी वापरता येईल.
हे काम यशस्वी होण्यासाठी सरपंच तानाजी बागल व उपसरपंच संतोष बागल यांनी परिश्रम घेतले. तसेच सदस्य मुबारक मुल्ला यांनी स्वमालकीचा ट्रॅक्टर माल वाहतुकीला देऊन सहकार्य केले. (वार्ताहर)


नागरिकांची वणवण थांबणार..!
येरळवाडी धरणातून करण्यात येणाऱ्या नियोजित नळ पाणीपुरवठा योजनेसाठी मोठ्या साठ्याची विहीर उपलब्ध झाल्याने समाधान वाटते. शासनाचा आलेला निधी विकास कामासाठीच वापरला जाईल. कोणालाही एक रुपया खाऊ देणार नाही आणि खाणारही नाही. जिथे निधी कमी पडेल तिथे पदरमोड करणार.
- तानाजी बागल, सरपंच, कातरखटाव

Web Title: Rejuvenation of wet well for water resources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.