रुग्णांच्या नातेवाइकांना मिळणार पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:44 AM2021-05-25T04:44:19+5:302021-05-25T04:44:19+5:30
सातारा: जिल्ह्यात आज, मंगळवारपासून कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. आता रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णांना भेटण्यासाठी किंवा त्यांना आवश्यक ...
सातारा: जिल्ह्यात आज, मंगळवारपासून कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. आता रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णांना भेटण्यासाठी किंवा त्यांना आवश्यक सुविधा देण्यासाठी पोलिसांकडून पास मिळणार आहे. हा पास असेल तरच रुग्णांच्या नातेवाइकांना रुग्णालयात जाता येणार आहे. अन्यथा विनापास रस्त्यावर दिसल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे.
नातेवाइकास देण्यात आलेल्या पासची वैधता रुग्ण औषधोपचाराकरिता शासकीय रुग्णालयात कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या मुदतीकरिता देण्यात आलेली आहे. ज्या व्यक्तीकडे पास परवाना असेल, त्यांच्यावर कारवाई होणार नाही. परंतु, ज्या व्यक्ती विनाकारण, विना परवाना फिरताना आढळून येतील, त्यांच्यावर पोलीस कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी केले आहे.