यात्रा रद्द असतानाही गावात आल्यास नातेवाइकांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:38 AM2021-04-15T04:38:10+5:302021-04-15T04:38:10+5:30
यात्रेच्या अनुषंगाने परंपरेने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गावातील ग्रामस्थांची बैठक घेण्यात येते. या बैठकीत यावर्षीची यात्रा रद्द करण्याचा निर्णय सर्वानुमते ...
यात्रेच्या अनुषंगाने परंपरेने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गावातील ग्रामस्थांची बैठक घेण्यात येते. या बैठकीत यावर्षीची यात्रा रद्द करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. तसेच यात्रेच्या अनुषंगाने होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच गावातील व बाहेरून आलेल्या भाविकांना श्रींचे दर्शनास बंदी घालण्यात आली आहे. तरी बाहेरगावचे माहेरवाशिण, पै पाहुणे यांनी यात्रेसाठी येऊ नये. आल्यास आपण ज्यांच्या घरी आला आहात, त्यांना ग्रामपंचायतीने आकारलेल्या दंडाला सामोरे जावे लागेल. दरम्यान, श्री कालभैरवनाथाची पूजाअर्चा गावातील पुजाऱ्यांमार्फत केली जाईल. तसेच गावामध्ये मुंबई, पुणे व इतर बाहेरगावाहून आलेल्या लोकांनी आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीस माहिती देऊन आपली आवश्यक तपासणी करून घ्यावी. चारपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, आपणच आपली काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सर्वांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच ,सदस्य, यात्रा समिती व ग्रामस्थांनी केले आहे.