कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 11:05 AM2022-08-12T11:05:07+5:302022-08-12T11:05:26+5:30
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू असुन शिवसागर जलाशयात प्रतिसेकंद 49524 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे.
कोयनानगर : कोयना धरणाचे सहावक्र दरवाजे शुक्रवारी सकाळी दहा उघडण्यात आले असुन कोयना नदीत एकुण 10100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे सुरक्षतेच्या कारणास्तव कोयना कृष्णानदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू असुन शिवसागर जलाशयात प्रतिसेकंद 49524 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे. धरणातील पाणीसाठा 87.60 टीएमसी इतका झाला असुन पाणलोट क्षेत्रात अद्यापही पावसाचा जोर कायम आहे.त्यामुळे कोयना सिंचन विभागाने धरणातील पाणीपातळी नियंत्रीत करण्यासाठी शुक्रवारी सकाळी धरणाचे सहावक्र दरवाजे दीड फुटाने उचलुन कोयना नदीपात्रात 8000 क्युसेक्स व पायथा वीजगृहातुन वीजनिर्मितीकरून 2100 क्युसेक्स अहे मिळुन कोयना नदी पात्रात 10100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
शुक्रवारी सकाळी आठ वाजता धरणातील पाणीसाठा 87.60 टीएमसी इतका आहे गतवर्षी 90.88 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता.
मागील काही वर्षांत धरणाच्या वक्रदरवाज्यातुन सुरू केलेला पाण्याचा विसर्ग
दि 17 जुलै 2018
दि03 ऑगस्ट 2019
दि.15 ऑगस्ट 2020
दि.23 जुलै 2021
कोयना धरणाचे सहावक्र दरवाजे पाण्याचा विसर्ग करताना प्रथम एक व सहा क्रमांकाचा दरवाजा उघडला जातो
नंतर तीन व चार व शेवटी दोन व पाच क्रमांक असे क्रमाने दरवाजे उचलले जातात.