पावसाचे वाहून जाणारे पाणी पाझर तलावात सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:23 AM2021-07-24T04:23:08+5:302021-07-24T04:23:08+5:30

आदर्की : सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेला पावसाची संततधार सुरू राहिल्याने धरणे काटोकाठ भरली, पण जिल्ह्याच्या पूर्वेला फलटण तालुक्यात मोठ्या पावसाने ...

Release rainwater runoff into the percolation pond | पावसाचे वाहून जाणारे पाणी पाझर तलावात सोडा

पावसाचे वाहून जाणारे पाणी पाझर तलावात सोडा

Next

आदर्की : सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेला पावसाची संततधार सुरू राहिल्याने धरणे काटोकाठ भरली, पण जिल्ह्याच्या पूर्वेला फलटण तालुक्यात मोठ्या पावसाने पाठ फिरविल्याने ओढे-नाले, शेकडो पाझर तलाव कोरडे ठणठणीत असल्याने, धोम-बलकवडी धरणातून नदीला सोडलेले पाणी खंडाळा-फलटण तालुक्यात सोडले आहे. त्या पाण्याने पाझर तलाव भरून देण्याची मागणी शेतकरी, ग्रामस्थांतून होत आहे.

सातारा जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, सातारा, पाटण, कऱ्हाड तालुक्यात गत आठवड्यापासून संततधार पाऊस सुरू आहे, पण फलटण तालुक्यात रिमझिम पाऊस पडत आहे. त्यामुळे खरीप हंगामातील बाजरी व इतर पिके चांगली आहे.

मे महिन्यापासून फलटण तालुक्यात मोठा पाऊस झाला नाही, त्यामुळे फलटण तालुक्यातील शेकडो पाझर तलाव व छोटी धरणे, सिमेंट बंधारे नालाबांध, ओढे, नाले, कोरडे ठणठणीत पडले आहेत. त्यामुळे आगामी रब्बी हंगामात पाणीटंचाई भासणार आहे, तरी धोम-बलकवडी व धोम धरणातून पाणी नदीला सोडले जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात येतो, त्याऐवजी नदीला सोडलेले पाणी धोम-बलकवडीच्या उजव्या कालव्यातून फलटण खंडाळा तालुक्यातील ओढ्याला सोडून त्या पाण्यातून पाझर तलाव धरणे सिमेंट बंधारे नालाबांध भरून आगामी होणारी पाणीटंचाई दूर करण्याची गरज आहे. याचा विचार करून प्रशासनाने धोम-बलकवडी धरणातून पाणी उजव्या कालव्यात सोडलेल्या पाण्यातून पाझर तलाव भरून द्यावे, अशी मागणी फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

प्रतिक्रिया

जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस पडल्याने, धोम-बलकवडी धरण भरल्याने पाणी नदीला सोडले आहे. ते पाणी खंडाळा-फलटण तालुक्यात सोडले आहे. त्या पाण्याने पाझर तलाव भरून घ्यावेत व त्या पाण्याची पाणीपट्टी आकारू नये, कारण कोरोनामुळे शेतकऱ्याच्या मालाला दर नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.

- अमोल रासकर, ग्रामपंचायत सदस्य, सासवड झणझणे, फलटण

चौकट

रब्बी हंगामात टंचाई भासणार...

गतवर्षी फलटण तालुक्यात चांगला पाऊस होता, पण या वर्षी मोठ्या पावसाने पाठ फिरविल्याने रब्बी हंगामात पाणीटंचाई भासणार आहे. पावसाळा संपत आला, तरी ओढे -नाले, पाझर तलाव, तांबवे, हिंगणगाव, मुळीकवाडी, कुरवली धरणात मृतसाठा आहे. तरी धोम-बलकवडी उजव्या कालव्यातून पाणी सोडल्याने शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. आदर्की, बिबी, ढवळ, उपळवे, मिरढ, जावळी गावांपर्यंत पाणीटंचाई भासणार नाही.

२३आदर्की

फोटो -फलटण पश्चिम भागात कोरडे पडलेले पाझर तलाव.

Web Title: Release rainwater runoff into the percolation pond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.